अभ्यासाखेरीज सामाजिक भानही ठेवावे - प्रशांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

जुनी सांगवी - ‘‘केवळ परीक्षा डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करू नये. मला हे जमेल का, ही भीती मनातून काढून टाकावी. अभ्यासाबरोबरच सामाजिक भानही ठेवावे,’’ असे प्रतिपादन आयआरएस अधिकारी प्रशांत पाटील यांनी ‘स्पर्धा परीक्षा व अभ्यास’ या विषयावरील कार्यक्रमात केले. 

‘सकाळ यिन संवाद’ व बाबूरावजी घोलप महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सांगवी येथील बाबूरावजी घोलप महाविद्यालयात हा कार्यक्रम झाला. पाटील म्हणाले, ‘‘खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी’ ही धारणा विद्यार्थ्यांनी बदलली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींतून शिकले पाहिजे. आवडणाऱ्या विषयासाठी मनापासून प्रयत्न केले पाहिजेत. सामाजिक प्रश्नांत उतरून त्याला कृतीची जोड दिली पाहिजे; तरच शिक्षण व ध्येयाचे फलित झाले, असे म्हणता येईल.

समाजातील घडामोडींवर विद्यार्थ्यांनी लक्ष दिले पाहिजे. अनेकजण भाषा ही अडचण समजतात; मात्र कला व संधी समजून ती अवगत केल्यास अडचण येत नाही.’’  

या वेळी प्रशासनात राजकीय हस्तक्षेप वाढतोय का, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात मेळ कसा असतो, यूपीएससी परीक्षा मराठीतून देता येते का, आदी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे पाटील यांनी निरसन केले. त्यात विद्यार्थिर्नीचा सहभाग मोठा होता. 

प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. चंदा हासे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी यिन प्रतिनिधी तुषार मोहिते उपस्थित होते.

Web Title: Sakal YIN Sanvad Event Study Social Activities Prashant patil