धम्माल अन्‌ आनंदाचा "बालमेळा'

Sakal Youn Buzz and CM International school to organise Balmela in Pune
Sakal Youn Buzz and CM International school to organise Balmela in Pune

पुणे : वर्गाबाहेरील शिक्षण मुलांना अधिक आनंद व उत्साह देऊन जाते. म्हणूनच मनोरंजनातून शिक्षण या संकल्पनेवर "सकाळ यंग बझ' व "सीएम इंटरनॅशनल स्कूल'ने शनिवारी (ता. 24) बालमेळा आयोजित केला आहे.

बाणेर-बालेवाडी परिसरातील सीएम इंटरनॅशनल स्कूल येथे हा बालमेळा सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत होणार आहे. 

आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल मुलांच्या मनात उत्सुकता असते. ही उत्सुकता आणि मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे अनेक खेळ या मेळ्यामध्ये असतील. मातीची भांडी करणे, टॅटू काढण्याबरोबरच रिंगटॉस, बॉल पूल, वॉलक्‍लाइंबिंग असे खेळ गेम झोनमध्ये असतील. मुलांच्या आवडीचे चॉकलेट फाउंटन, जादूगार आदी अनेक मनोरंजक सादरीकरणेही आहेत. सोबत मुलांच्या आवडीच्या असंख्य प्रकारच्या पदार्थांची मेजवानीही असणार आहे. 

प्रवेश शुल्क ः 150 रु. (चार व्यक्तींच्या कुटुंबासाठी) 
प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण : सीएम इंटरनॅशनल स्कूल 
अधिक माहितीसाठी संपर्क : 8805009395

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com