शिरूरच्या पश्‍चिम भागात खुलेआम गुटखाविक्री

युनूस तांबोळी
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

टाकळी हाजी: शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात काही ठिकाणी छुप्या तर, काही ठिकाणी खुलेआम चालणाऱ्या गुटखा विक्रीच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.

टाकळी हाजी: शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात काही ठिकाणी छुप्या तर, काही ठिकाणी खुलेआम चालणाऱ्या गुटखा विक्रीच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.

पानपट्टी किंवा घराचा आसरा घेऊन मोठ्या गावांमध्ये गुटखा विक्री होत आहे. सध्या तर हॉटेल, किराणा दुकानात खुलेआम गुटखा विक्रीने स्वरूप धारण केले आहे. शासन पातळीवरूनही गुटखा बंदीचा दबाव होत असला तरी देखील कारवाई होत नाही. शाळांच्या परिसरातील दुकांनामध्ये अशी गुटखा विक्री सुरू असल्याने सध्या गुटखा, मावा या सारख्या विक्रीने लहान मुले व तरुण याकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे.
टाकळी हाजी, पिंपरखेड, जांबूत, फाकटे, कवठे येमाई, सविंदणे, कान्हूर मेसाई, मलठण या परिसरात गुटखा विक्रीची गाडी फिरत असल्याचे नागरिक सांगत आहेत. अन्न व औषध प्रशासनाने अशा दुकानांवर कारवाई करून दुकानदारांवर गुन्हा दाखल करून दुकाने सील करणे गरजेचे आहे.

रोडरोमिओंचा धुडगूस
पिंपरखेड (ता. शिरूर) या परिसरात रोडरोमिओंचा त्रास वाढला आहे. मुलींचा पाठलाग करणे, छेडछाड करणे, असे प्रकार होऊ लागल्याने ग्रामस्थांनी याबाबत टाकळी हाजी औटपोस्टला तक्रार दिली आहे. अशा रोडरोमिओंचा तत्काळ बंदोबस्त केला जाईल, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे यांनी दिली.

Web Title: sale gutka at shirur taluka