कान्हूर मेसाईच्या उपसरपंचपदी सलीमा तांबोळी

युनूस तांबोळी
बुधवार, 13 जून 2018

टाकळी हाजी (पुणे): कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील उपसरपंचपदी सलीमा युनूस तांबोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

उपसरपंच शीतल शिंदे यांनी राजीनामा दिल्याने येथील जागा रिक्त झाली होती. सरपंच दादा खर्डे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत उपसरपंच निवड करण्यात आली. सलीमा युनूस तांबोळी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक शेलार यांनी काम पाहिले. अंजुमन इत्तेहाद तंबोलीयान जमातचे अध्यक्ष युनूस तांबोळी व ओबीसी संघटनेचे शिरूर तालुका अध्यक्ष अल्ताफ तांबोळी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Salim Tamboli as the vice sarpanch of Kanhur Masai