सलोनी व सानिका जाधव भगिनींना राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण व रौप्य

प्रशांत चवरे 
सोमवार, 7 मे 2018

भिगवण : भादलवाडी ता. इंदापुर) येथील बिल्ट इंग्लिश मेडियम स्कुलच्या विद्यार्थिनी सलोनी जाधव व सानिका जाधव या दोघी भगिनींनी बालेवाडी पुणे येथे संपन्न झालेल्या सहाव्या नॅशनल ट्रेडिशनल रेसलींग व पॅनक्रेशन चॅम्पीयनशीप स्पर्धेमध्ये ३ सुवर्ण व ३ रौप्य पदके मिऴवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील मुलींनी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये केलेल्या या चमकदार कामगिरी बद्दल त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

बालेवाडी, पुणे येथील श्री शिवछत्रपती आंतरराष्ट्रीय क्रिडा संकूलामध्ये ऑल इंडिया ट्रेडिशनल रेसलींगच्या वतीने राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेमध्ये सलोनी संतोष जाधव या भादलवाडी येथील विद्या प्रतिष्ठाण बिल्ट  इंग्लिश मिडियम स्कुलच्या  इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीने १४ वर्षे वयोगटाखालील ५० किलो वजन गटामध्ये मास रेसलींग, पॅनक्रेशन रेसलींग व बेल्ट रेसलिंग या तीन प्रकारामध्ये सहभाग घेतला होता. त्यापैकी तिने मास रेसलींग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक तर पॅनक्रेशन रेसलींग व बेल्ट रेसलींग या दोन्ही स्पर्धामध्ये रौप्यपदक पटकावले आहे. 

याच स्कुलमधील सानिका संतोष जाधव या इयत्ता तिसरी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीने ९ वर्षे वयोगटाखालील २६ किलो वजन गटामध्ये मास रेसलींग, पॅनक्रेशन रेसलींग व बेल्ट रेसलिंग या स्पर्धामध्ये सहभाग घेतला होता. त्यामध्ये मास रेसलींग व पॅनक्रेशन रेसलींग या दोन स्पर्धामध्ये सुवर्ण पदक तर बेल्ट रेसलींगमध्ये रौप्यपदक पटकावले आहे. दोघी भगिनींनी मिळुन राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तीन सुवर्ण व तीन रौप्य पदके पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दोघींना  महाराष्ट्र राज्य ज्युदो कराटे स्पोर्ट अॅकॅडमीचे अध्यक्ष दत्तात्रय व्यवहारे, प्रशिक्षक जयश्री व्यवहारे, अजिनाथ बळगानोरे, सुनिल जाधव, सागर बनसुडे, ज्ञानेश्वर भोई, अनिल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. विद्या प्रतिष्ठाण बिल्ट इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या सरिता शिंदे, क्रिडा शिक्षक श्री. नवनाथ इंगळे अभिनंदन केले.

Web Title: saloni and sanika jadhav wins gold and silver in national level