पुण्यात सलून, ब्युटीपार्लर बंदच राहणार

Beauty parlor
Beauty parlor

पुणे : शहर अनलॉक होताना सलून आणि ब्युटीपार्लर बंदच राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले. आज मंगळवारी ही दुकाने उघडली होती, पण प्रशासनाने काही भागातील दुकाने बंद केली. महापालिकेने पुण्यातील सर्व प्रकाराची दुकाने सोमवार ते शुक्रवारी सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सलून, ब्युटीपार्लर सुरू राहणार असल्याचे सोमवारी सांगितले होते. मात्र, राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार सलून व ब्युटीपार्लर बंदच राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

salon
salonesakal
Beauty parlor
'भाई' बनण्याआधीच पुणे पोलीस आवळणार मुसक्या

कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri - Chinchwad) महापालिका प्रशासनाने पुणेकरांना सुखद धक्का दिला. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सर्व दिवस तर इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत खुली ठेवता येणार आहेत. त्यामुळे शहराचा आर्थिक गाडा पुन्हा एकदा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. दहा दिवसानंतर कोरोनाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेणार आहे, असे पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी आदेशात स्पष्ट केले.

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुणे आणि पिंपरीत दोन महिन्यांपासून कडक निर्बंध लावले होते. या काळात केवळ वैद्यकीय सेवा व अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू होती. परंतु, कोरोनाची लाट ओसरत असताना राज्य सरकारच्या निर्देशानुसार दोन्ही महापालिकांनी सोमवारी आदेश जाहीर केले. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाच्या निर्णयाची माहिती दिली.

Beauty parlor
पुणे जिल्ह्याला मोठा दिलासा! नव्या रुग्णसंख्येत घट

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com