इतरांशी जुळवून घेऊन एकत्र नांदावे - बालाजी तांबे

इतरांशी जुळवून घेऊन एकत्र नांदावे - बालाजी तांबे

पुणे - ‘‘सर्वांनी कोणतीही तक्रार न करता एकत्र नांदावे, असा भाव समाजात निर्माण करण्याची गरज आहे. इतरांशी काय जुळत नाही, हे पाहण्यापेक्षा काय जुळते हेच पाहिले पाहिजे. त्यातूनच शांतता नांदू शकेल,’’ असे प्रतिपादन श्रीगुरू बालाजी तांबे यांनी केले.

ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तांबे यांच्या हस्ते अभिनेता मोहन जोशी यांना समाजभूषण पुरस्कार, इतिहासाचे अभ्यासक डॉ. शेषराव मोरे यांना समाजस्नेह पुरस्कार, उद्योजक संजीव पेंढारकर यांना स्व. दाजीकाका गाडगीळ उद्योगरत्न पुरस्कार, तर गायिका आर्या आंबेकर यांना युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महापौर मुक्ता टिळक, संघटनेचे अध्यक्ष अंकित काणे उपस्थित होते. 

पेंढारकर म्हणाले, ‘‘मराठी ब्राह्मणांकडे अमाप बुद्धी आहे; परंतु ती स्वत:च्या प्रगतीसाठी वापरत नाहीत. अमेरिकेत जाऊन तिथे आयटी कंपन्यांत गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या हे लोक करतात; पण जो स्वतःचा व्यवसाय करतो, तो पगार मिळविणाऱ्या लोकांपेक्षा कांकणभर सरस आहे.’’

काणे म्हणाले, ‘‘समाजातील तरुणांना दिशा देणे, त्यांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच समाजातील महापुरुषांची टिंगल केली जाते, हे रोखण्याच्या उद्देशाने संघटना स्थापन केली आहे. समाजातील तरुणांना एमपीएससी, यूपीएससी परीक्षेसाठी प्रशिक्षणाचा उपक्रम चालविला जातो. जे तरुण बाहेरगावाहून पुण्यात शिक्षणासाठी येतात, त्यांच्यासाठी सुसज्ज वसतिगृह बांधण्याचा आमचा संकल्प आहे.’’

डॉ. शेषराव मोरे म्हणाले, ‘‘समाजात विचारवंत म्हणून जे मिरवतात, त्यांनीच स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केली आहे. जातीयवादी म्हणून त्यांना हिणवले, त्यामुळे अस्वस्थ होऊन खरे सावरकर कोण हे समजाविण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले आहेत. धर्मग्रंथांपेक्षा विज्ञानाचे पान उघडा आणि सर्व हिंदू एकाच रक्ताचा आहे, असे म्हणणाऱ्या सावरकरांना जातीयवादी कसे म्हणता येईल? त्यांना बुद्धिवादाचे प्रमाणच मानावे लागेल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com