शरद पवार यांना फुले समता पुरस्कार

शरद पवार यांना फुले समता पुरस्कार

पुणे : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. परिषदेचे राज्याचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी सोमवारी (ता. २६) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘महात्मा फुले यांच्या १२८ व्या पुण्यतिथीनिमित्त समता भूमी, महात्मा फुले राष्ट्रीय स्मारक, महात्मा फुले पेठ येथे आयोजित समता दिन कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री उपेंद्र कुशवाहा, पालकमंत्री गिरीश बापट, परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ आदी उपस्थित राहणार आहेत.’’ या वेळी बापूसाहेब भुजबळ, मंजिरी घाडगे, पंढरीनाथ बनकर, प्रीतेश गवळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com