ज्ञानोबा, तुकोबांपेक्षा मनू एक पाऊल पुढे: संभाजी भिडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

धर्माचार्य सध्या कसा होईल ते ज्ञानोबा, तुकोबानी सगळ्या संत परंपरेने, ऋषीमुनी आणि तपस्वी लोकांनी  आपल्याला शिकवले आहे. मात्र, मनू त्यांच्यापेक्षाही एक पाऊल पुढे आहे. वैदिक हिंदू धर्म हा अनुभव सिद्ध असून मनाला जिंकून घेण्याची प्रक्रिया म्हणजे धर्माचार होय.

पुणे : धर्माचार्य सध्या कसा होईल ते ज्ञानोबा, तुकोबानी सगळ्या संत परंपरेने, ऋषीमुनी आणि तपस्वी लोकांनी आपल्याला शिकवले आहे. मात्र, संत मनू त्यांच्या पेक्षाही एक पाऊल पुढे आहे, असे वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले आहे.

संभाजी भिडे यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे दर्शन घेतले. यावेळी धारकरी वारीत सहभागी झाले होते. यंदा पोलिसांनी नोटीस दिल्याने तलवारी वापरण्यात आल्या नव्हत्या. जंगली महाराज मंदिरात संभाजी भिडे यांचे व्याख्यान झाले. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. संभाजी भिडे हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहतात.

धर्माचार्य सध्या कसा होईल ते ज्ञानोबा, तुकोबानी सगळ्या संत परंपरेने, ऋषीमुनी आणि तपस्वी लोकांनी  आपल्याला शिकवले आहे. मात्र, मनू त्यांच्यापेक्षाही एक पाऊल पुढे आहे. वैदिक हिंदू धर्म हा अनुभव सिद्ध असून मनाला जिंकून घेण्याची प्रक्रिया म्हणजे धर्माचार होय. धर्म हा आचरणातून बळकट होतो. त्याला अधिक बळकटी देण्यासाठी संघटनांची गरज असून सर्व हिंदू धर्मियांनी एकत्र यायला हवे, असे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.

Web Title: Sambhaji Bhide talked about Sant Manu and Sant Dnyaneshwar Maharaj Sant Tukaram Maharaj