पुण्यात संभाजी भिडेंच्या सन्मानार्थ नदीपात्रात ठिय्या आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

कोरेगाव भीमा प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना अडकवण्यात आले असून संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी करण्यात येत होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सखोल चौकशी नंतरच भिडे गुरुजींचा संबंध नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सत्य समोर आले असून आम्ही भिडेंच्या सन्मानार्थ मोर्चा काढला होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ही निषेधार्थ बाब असून आम्ही पोलिसांच्या सूचनांचे पालन करणार आहोत.

पुणे : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली असून संभाजी भिडे यांना देखील अटक करण्यात यावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईमध्ये एल्गार परिषद घेऊन मागणी केली होती. या मागणीचा शिवप्रतिष्ठानकडून निषेध व्यक्त करण्यात आला असून संभाजी भिडे यांच्या सन्मानार्थ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे. तर पुण्यात लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी नदी पात्रात ठिय्या मांडून आंदोलन करित खोटे गुन्हे मागे घ्यावे, मिलिंद एकबोटे यांची सुटका करावी. तसेच संभाजी भिडे यांना खोटे गुन्ह्यात अडकवण्यात येत आहे, अशा घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी राहुल फटांगडेच्या आई देखील सहभागी झाल्या होत्या. यानंतर काही मोजक्या पदाधिकायांना पोलिसांच्या गाडीतून जिल्हाधिकायांना निवेदन देण्यास गेले.

यावेळी राहुल फटांगडे यांच्या आई म्हणाल्या की, कोरेगाव भीमा येथील घटनेत माझ्या मुलाची हत्या होऊन तीन महिन्याचा कालावधी झाला. अजून आरोपीला सापडले नसून ही निषेधार्थ बाब आहे.

यावेळी शिवप्रतिष्ठानचे पराश मोने म्हणाले की, कोरेगाव भीमा प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना अडकवण्यात आले असून संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी करण्यात येत होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सखोल चौकशी नंतरच भिडे गुरुजींचा संबंध नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सत्य समोर आले असून आम्ही भिडेंच्या सन्मानार्थ मोर्चा काढला होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ही निषेधार्थ बाब असून आम्ही पोलिसांच्या सूचनांचे पालन करणार आहोत. या जागी ठिय्या मांडून निषेध व्यक्त करणार आहोत. अशी भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी मिलिंद एकबोटे यांच्या वहिनी जोत्सना एकबोटे म्हणाल्या की, कोरेगाव भीमा येथील दंगली प्रकरणी मिलिंद एकबोटे यांचा काही ही संबंध नसताना अडकवण्यात आले असून त्यांची सुटका करावी अशी मागणी केली.

Web Title: Sambhaji Bhides Shiv Pratisthan agitation in Pune