भिडेंच्या वक्तव्याबाबत संभाजी ब्रिगेडची तक्रार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

पुणे - संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल संभाजी भिडे यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सोमवारी तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर संत व राष्ट्रपुरुषांच्या अवमानाबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जंगली महाराज मंदिरासमोर मनुस्मृतीचे दहन करून भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविला. 

संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी शनिवारी पुण्यात दाखल होण्यापूर्वी भिडे यांनी जंगली महाराज मंदिरात आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्या वेळी त्यांनी ‘संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा मनू एक पाऊल पुढे होते,’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. 

या पार्श्‍वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यामुळे भिडे यांच्याविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. जंगली महाराज मंदिरातील भिडे यांच्या व्याख्यानाची चित्रफीत तपासण्यात येत आहे. त्यात तथ्य आढळून आल्यास पुढील कारवाई करणार असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली.

Web Title: Sambhaji Brigade complaint about Bhide statement