'पुण्याचे नाव बदलून जिजापूर करा'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

पुणे - पुणे शहर हे राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखले जाते. त्यामुळे पुण्याचे नाव बदलून जिजापूर करण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच, याबाबत मुख्यमंत्र्यांकडेही मागणी करण्यात येणार आहे. 

पुणे शहर जिजाऊ मॉंसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी वसविले आहे. त्यांच्या कर्तृत्ववान शौर्याचा इतिहास समाजासमोर येणे अपेक्षित आहे. केंद्र आणि राज्यातील सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आले आहे. राज्य सरकारने शिवप्रेमींच्या भावनांचा आदर ठेवून पुण्याचे नाव बदलून जिजापूर करावे. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ घ्यावा, असे निवेदनात नमूद केले आहे. 

या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे आणि शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ यांनी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांच्याकडे सोपविले. संभाजी ब्रिगेडचे मंदार बहिरट, प्रकाश धिंडले, चंद्रशेखर घाडगे आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. 

Web Title: sambhaji brigade Demand Change the name of Pune to Jijapur