आनंदनगरमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

राजकुमार थोरात
सोमवार, 14 मे 2018

वालचंदनगर : आनंदनगर (ता.इंदापूर) येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे पुजन करण्यात आले.

येथे संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्य्रकमांचे आयोजन केले होते. सकाळी प्रवीण माने यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी माने यांनी सांगितले की,छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले रयतचे राज्य छत्रपती संभाजी महाराजांनी यशस्वीपणे पुढे चालवले. ते शुत्रपुढे कधीही झुकले नव्हते.वाघाच्या जबड्यामध्ये हात घालण्याचे धाडस केले होते. त्यांच्या कार्याचा युवकांनी आदर्श घेवून समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.यावेळी व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी योगेश कणसे,विलास पवार,डाॅ.संजीव लोंढें उपस्थित होत. कार्यक्रमाचे नियोजन अमित मोरे, उत्कर्ष देशमुख, सुभाष जाधव, संतोष लोणकर, लाला साळुंके, उदय देशमुख,ओंकार कणसे,विजय घोरपडे, विशाल अहिवळे,नाना देशमाने, सुमित साळुंके,अनुराग बेंद्रे, ओंकार भिसे या युवकांनी केले होते.
 
Web Title: sambhaji maharaj birth anniversary celebrated in anandnagar walchandnagar