लासुर्णेमध्ये संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

राजकुमार थोरात
सोमवार, 14 मे 2018

वालचंदनगर : लासुर्णे (ता. इंदापुर) येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

सकाळी जयंती निमित्त छत्रपती संभाजी महाराजांच्या पालखीची ढोलताशांच्या गजरात जंक्शन- लासुर्णे भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये 101 ढोल तांशाच्या आवाजाने लासुर्णे-जंक्शनचा परीसर दणाणला. आमदार दत्तात्रेय भरणे सहभागी झाले होते.

लासुर्णेमध्ये मिरवणुक पोचल्यानंतर पुणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने,उद्योजक अर्जून देसाई, मुंबई क्राईम विभागाचे पोलिस निरीक्षक महादेव निंबाळकर यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिववृक्ष संवर्धन मोहिमेतंर्गत आलेल्या नागरिकांना झाडांच्या वाटप करण्यात आले. यावेळी रहिमतपुर येथील प्राध्यापक मिथुन माने यांनी छत्रपती संभाजी महाराज व आजचा युवक या विषयावरील व्याख्यानाच्या कार्य्रकमांचे आयोजन केले होते.

यावेळी पंचायत समितीचे सभापती करणसिंह घोलप, जंक्शन येथील शिवकल्याण राजा प्रतिठानचे अध्यक्ष रामेश्वर माने,जिल्हा परिषद सदस्य सागर भोसले, छत्रपती कारखान्याचे संचालक अमोल पाटील, सर्जेराव जामदार, अँड तेजसिंह पाटील,मयूरसिंह पाटील, जंक्शनचे सरपंच राजकुमार भोसले,  कांतीलाल जामदार, सुहास भोसले उपस्थित होते. जंक्शन येथील शिवकल्याण राजाप्रतिठाण व लासुर्णे येथील श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव कमिटीच्या वतीने जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.

संभाजी महाराजांचा युवकांनी आदर्श घ्यावा...
यावेळी माने यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहेत. लासुर्णे मधील युवकांनी डी-जे विरहित साजरी केलेल्या जयंतीसारख्याच इतर सार्वजनिक उत्सव मंडळांनी अशाच जयंती साजरी कराव्यात. लासुर्णे मधील सतीश यादव यांनी तयार केलेल्या संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे कौतुक केले.

Web Title: sambhaji maharaj birth anniversary celebrated in lasurne