Video : दुचाकीस्वारांनो, आता संभाजी पुलावरुन निर्धास्तपणे जा कारण...

sambhaji pul
sambhaji pul

पुणे : तुम्ही दुचाकीवरुन टिळक चौकातून संभाजी पुलावरुन डेक्कनकडे जात असाल आणि तुम्हाला वाहतूक पोलिस अडवतील, अशी भिती असेल, तर घाबरू नका. कारण संभाजी पुल आता दुचाकींना वाहतूकीसाठी कायमस्वरुपी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे आता संभाजी पुलावरुन आता निर्धास्तपणे जा, तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही !

पुणे शहराच्या दोन भागांना जोडणाऱ्या संभाजी पुल अनेक वर्षांपासून दुचाकींना वाहतूकीसाठी बंद होता. पाऊस, वाहतूक कोंडी अशा काही तत्कालीक कारणांमुळे हा पुल तात्पुरत्या स्वरुपात कधी तरी दुचाकींसाठी खुला करण्यात येत होता. त्यानंतर पुन्हा टिळक चौक व खंडुजीबाबा चौक या दोन्ही चौकांमध्ये पुण्यात नव्याने आलेला एखादा दुचाकीस्वार चुकून या पुलावरुन गेला की, दोन्ही बाजुंनी दबा धरुन बसलेल्या पोलिसांच्या जाळ्यात तो हमखास सापडल्याशिवाय राहात नव्हता. वर्षानुवर्षे हे चित्र सुरू होते. परंतु यावेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी आणि त्यामध्ये दररोज अडकणाऱ्या लाखो दुचाकीस्वारांची समस्या वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी समजून घेतली. 

मागील आठ दिवसांपासून संभाजी पुलावरुन दुचाकींना कायमस्वरुपी प्रवेश देण्यास सुरूवात करण्यात आली. त्याबाबतच्या सुचना पोलिस उपायुक्त देशमुख यांनी दिल्या. त्यानंतर त्याची तत्काळ अंमलबजावणीही करण्यात आली. पुलाच्या दोन्ही बाजुंना लावण्यात आलेले 'दुचाकींना बंदी'चे फलक हटविण्यात आले. त्यामुळे आता दुचाकीस्वार निर्धास्तपणे डेक्कनच्या दिशेने व डेक्कन, कर्वेनगरहून मध्यवर्ती भागांमध्ये येण्यासाठी संभाजी पुलाचा वापर करु शकतात.

"संभाजी पुलावरुन दुचाकीला जाण्यास बंदी होती. सर्व कारणे, परिणामे लक्षात घेऊन या पुलावरुन दुचाकींना ये-जा करण्यासाठी आठ दिवसांपासूनच कायमस्वरुपी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता दुचाकीस्वार संभाजी पुलाचा वापर करु शकतील. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.''
- पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त. वाहतुक शाखा. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com