पूरग्रस्तांच्या मदतीला संभाजीराजे सरसावले; 5 कोटींची मदत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीमधील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 5 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पुणे : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीमधील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 5 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. खासदार संभाजीराजेंनी त्यांच्या वाट्याच्या निधीतून मदत जाहीर केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

संभाजीराजे यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, महापूरामध्ये अनेक गावे उध्वस्त झालेली आहेत. या गावांमध्ये मुलभूत सुविधा पुरवणे अत्यावश्यक असल्याने माझ्या निधीतून ५ कोटी रुपये या गावांमध्ये खर्च करण्याचा संकल्प केला आहे. मला कल्पना आहे की झालेल्या नुकसानाच्या प्रमाणात हा निधी अत्यल्प आहे, पण ही एक सुरुवात आहे. शिव-शाहू विचारांसाठी आणि समाजसेवेसाठी माझं संपूर्ण जीवनच समर्पित आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Raje helped flood victims by contributing 5 crore fund