केसरकरांच्या विधानावर भाष्य नाही - संभाजीराजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sambhajiraje

केसरकरांच्या विधानावर भाष्य नाही -संभाजीराजे

पुणे : संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेची उमेदवारी न दिल्याबद्दल शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केला होता. केसरकरांच्या या आरोपाबद्दल संभाजीराजे यांना विचारले असता, ‘‘माझ्यासाठी तो विषय संपला असून, मला काहीही भाष्य करायचे नाही.’’, असे स्पष्ट केले.

संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेची खासदारकी दिली नाही. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन पक्ष चालवण्याचा उद्धव ठाकरे यांना अधिकार नाही असा आरोप केसरकर यांनी केला होता. केसरकरांनी केलेल्या या आरोपावर पुण्यातील पत्रकारांनी संभाजी राजेंना त्यांचे मत विचारले. त्यावर उत्तर देताना संभाजी राजे म्हणाले,‘‘तो विषय माझ्यासाठी संपला आहे. माझे जे काही मत होते ते मी राज्यसभेतून बाहेर पडताना शिवाजी महाराजांचे स्मरण करून बोललो आहे. आता त्यावर मला काहीही भाष्य करायचे नाही. माझ्यात आणि शिवसेनेमध्ये राज्यसभेच्या उमेदवारीवरून ड्राफ्ट तयार करण्यात आला होता हे सत्य आहे. दिलेला शब्द त्यांनी पाळला नाही हे देखील सत्य आहे.

राज्यसभेची उमेदवारीवरून जे काही झाले तो विषय माझ्यासाठी संपलेला आहे आणि मला त्या विषयी काहीही चर्चा करायची नाही. केसरकर जे काही बोलले असतील त्या त्यांच्या भावना आहेत. माझी मते मी तेव्हाच पत्रकार परिषदेत स्पष्टपणे आणि सविस्तरपणे सांगितली होती, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.