सरकारकडून खायला मिळत नसल्याने विरोधकांची आगपाखड : संबित पात्रा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

'सत्तेच्या जवळ राहून भरमसाठ कमाई करणाऱ्यांना सध्याच्या सरकारकडून एक पैसाही मिळत नसल्याने असे लोक सरकारवर आगपाखड करीत आहेत. आत्ताचे सरकार गरीब, गरजूंना आधार देत असून आत्तापर्यंत देशाला लुटणारे आता भयभीत झाले आहेत, असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी व्यक्त केले. 

 पुणे : ''सत्तेच्या जवळ राहून भरमसाठ कमाई करणाऱ्यांना सध्याच्या सरकारकडून एक पैसाही मिळत नसल्याने असे लोक सरकारवर आगपाखड करीत आहेत. आत्ताचे सरकार गरीब, गरजूंना आधार देत असून आत्तापर्यंत देशाला लुटणारे आता भयभीत झाले आहेत, असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी व्यक्त केले. 

विश्व संवाद केंद्र, प. महाराष्ट्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्यावतीने "देवर्षी नारद पत्रकारिता गौरव पुरस्कार' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पात्रा यांच्या हस्ते श्‍याम आगरवाल यांना ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार, विश्वनाथ गरुड यांना सोशल मीडिया पुरस्कार, सिद्धराम पाटील यांना युवा पत्रकार तर शिवाजी गावडे यांना व्यंगचित्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी विश्व संवाद केंद्राचे मनोहर कुलकर्णी, डेक्कन एज्युकेशनचे उपाध्यक्ष एम. ए. आठवले, श्रीकृष्ण कानेटकर आदी उपस्थित होते. 

पात्रा म्हणाले, "देशात असहिष्णुतेच्या कारणावरून काही जण पुरस्कारवापसी करतात. तर, काही जणांकडून देशात राहण्याची भीती व्यक्त केली जाते. मात्र, सध्याचे सरकार गोरगरिबांसाठी काम करणारे असून कुणाच्याही सांगण्यावरून कुणाचे काम केले जात नाही. यामुळे काही लोक भयभीत झाले आहेत. सरकारकडून ज्यांना काही मिळत नाही, त्यांच्याकडून आगपाखड केली जात आहे.'' नवा भारत बनवायचा असेल तर प्रत्येकाला एक आदर्श घेऊन पुढे जावे लागेल. आदर्शातून आत्मविश्वास निमार्ण करणे गरजेचे आहे. आत्मविश्वास तुटलेले राष्ट्र पुढे जाऊ शकत नाही. असे प्रतिपादन करताना पात्रा म्हणाले, "शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन वाटचाल करणारे महाराष्ट्राने प्रत्येक क्षेत्रात योगदान आहे. पुरस्काराला उत्तर देताना यावेळी श्‍याम आगरवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sambit patra target opposition party