पुण्यात संविधान सन्मान मूक मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

पुणे : संविधान सन्मान मूक मोर्चा संयोजन समितीतर्फे रविवारी (ता.27) काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी पार्किंग, मार्ग, रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक व आपत्कालीन व्यवस्थांसह सर्व तयारी करण्यात आली आहे. वाहतूक, सुरक्षितता व कायदा सुव्यवस्थेबाबत पोलिस प्रशासनाकडून समितीच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले, तर मोर्चा सुरळीत पार पडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे संयोजकांनी शनिवारी स्पष्ट केले. 

पुणे : संविधान सन्मान मूक मोर्चा संयोजन समितीतर्फे रविवारी (ता.27) काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी पार्किंग, मार्ग, रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक व आपत्कालीन व्यवस्थांसह सर्व तयारी करण्यात आली आहे. वाहतूक, सुरक्षितता व कायदा सुव्यवस्थेबाबत पोलिस प्रशासनाकडून समितीच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले, तर मोर्चा सुरळीत पार पडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे संयोजकांनी शनिवारी स्पष्ट केले. 

मोर्चामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, युवती, लहान मुले, अपंग, दृष्टिहीन यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ तरुण व विविध घटकांमधील नागरिक सहभागी होणार आहेत. मोर्चासाठी मोठ्या संख्येने नागरिक येण्याची शक्‍यता असल्याने पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत. पुणे जिल्हा उपनिरीक्षक पंकज ढाणे, वाहतूक शाखेचे राजेंद्र भामरे यांनी वाहतुकीच्या नियमांबाबत स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. संविधान सन्मान मूक मोर्चासाठी तब्बल 12 रुग्णवाहिकांची व्यवस्था केली आहे. मोर्चामध्ये अधिकृत बॅनरशिवाय कोणतेही वैयक्तिक, संस्था, संघटना किंवा पक्षाचे बॅनर्स आणण्यास; तसेच कचरा करण्यास संयोजकांनी मनाई केली आहे. मोर्चात स्वच्छता राखून आचारसंहितेचे पालन करावे आणि वैद्यकीय मदतीसाठी संपर्क 108 व 9689934284 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 

मोर्चा सुरू होण्याचे ठिकाण : छत्रपती संभाजी महाराज पुतळा, डेक्कन. 
वेळ : सकाळी 11 वाजता 
मोर्चाचा मार्ग : खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता, संत कबीर चौक, समर्थ पोलिस ठाणे, नेहरू मेमोरिअल हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, इस्कॉन मंदिर, ब्लू नाईल हॉटेल, विधान भवन. 
मोर्चाचा समारोप : विधान भवन. दुपारी 1.30 वाजता 

सर्व भागातून येणाऱ्या वाहनांसाठी त्या-त्या रस्त्यावरील पार्किंगची ठिकाणे 
दुचाकी पार्किंग-कॉंग्रेस भवन, बीएमसीसी महाविद्यालय, विमलाबाई गरवारे, न्यू इंग्लिश स्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय, सणस मैदान परिसर, भावे स्कूल, नूमवि मुलींची शाळा, मॉडर्न महाविद्यालय, शिवाजी मराठा हायस्कूल, महाराष्ट्र विद्यालय, महाराष्ट्र मंडळ, टिळक रस्ता, राजश्री शाहू विद्यालय, पर्वती, स.प. महाविद्यालय, संगमवाडी स्काउट ग्राउंड, वाडिया महाविद्यालय, गोळीबार मैदान, महापालिका, सरस्वती मंदिर, कटारिया हायस्कूल, शिंदे हायस्कूल, सहकारनगर अण्णा भाऊ साठे सभागृह, सातारा रोड, वानवडी, केदारीनगर सर्कल, कलाप्रसादसमोरील मैदान, सुभाषनगर, आंबिल ओढा, पुणे महापालिकेच्या सर्व शाळा. 

चारचाकी वाहने पार्किंग - 
ओंकारेश्‍वर नदीपात्र, एसएसपीएमएस, गरवारे महाविद्यालय, गोळीबार मैदान, डीपी रोड म्हात्रे पूल, एरंडवणा नदीपात्र, डेक्कन, बालगंधर्व चौक.

Web Title: Samvidhan Sanman Morcha in Pune