वाळूउपसा करणाऱ्या बोटी स्फोटकाने उडविल्या

Boat-Blast
Boat-Blast

राहू - कोरेगाव भिवर (ता. दौंड) येथील भीमा नदीच्या पात्रात वाळूचा अनधिकृत उपसा करणाऱ्या प्रत्येकी तीन फायबर आणि सेक्‍शन बोटी दौंड तहसील कार्यालयाच्या पथकाने जिलेटिनच्या साह्याने उद्‌ध्वस्त केल्या. तहसीलदार बालाजी सोमवंशी व राहूचे मंडलाधिकारी व्ही. एस. धांडोरे यांनी ही माहिती दिली. 

या कारवाईत धांडोरे, विजय खारतोडे (केडगाव), दीपक कोकरे (यवत), पी. एस. भोंडवे (पाटस) या मंडलाधिकाऱ्यांसह पी. सी. जगताप, ए. एन. स्वामी, एस. एस. झिंगाडे, ए. के. ढगे, पी. एन. केंद्रे, संदीप भालेराव यांनी भाग घेतला. 
गेल्या अनेक दिवसांपासून भीमा नदीतून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत होता. याबाबत सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. महसूल विभागाने उशिरा का होईना कारवाई केली असली तरी इतर ठिकाणीही अशीच कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com