मुळशीनंतर आता वाळू पॅटर्न - प्रवीण तरडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

बावधन - मुळशी तालुका वारकऱ्यांचा, कुस्तीगीरांचा, उद्योजकांचा, राजकारण्यांचा आहे. ही तालुक्‍याची ओळख जगभर पोचवायची आहे. यापुढे वाळूमाफियांवर आधारित रेती पॅटर्न या चित्रपटाची निर्मिती करणार आहे, असे भावोद्गार प्रसिद्ध अभिनेते प्रवीण तरडे यांनी बावधन बुद्रुक येथे काढले.

मुळशी पॅटर्न चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञांचा मुळशी तालुका पत्रकार संघ आणि नगरसेवक किरण दगडे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या पत्नी निर्मलाताई, माजी खासदार अशोक मोहोळ, माजी आमदार शरद ढमाले, तुकाराम हगवणे, सत्यवान उभे, किरण दगडे, अल्पना वरपे, श्रद्धा प्रभुणे, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, बबनराव दगडे, सरपंच पियुषा दगडे आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, की शेतजमीन विकल्यानंतर कुटुंबाची अवस्था कशी बिकट होते, त्यातून निर्माण होणाऱ्या गुन्हेगारीचे वास्तववादी दर्शन या चित्रपटातून दाखविले आहे. आतापर्यंत मिळालेले सगळे पुरस्कार आई-वडिलांना समर्पित करतो. प्रास्ताविकात किरण दगडे यांनी तालुक्‍याची पार्श्वभूमी स्पष्ट केली.

या वेळी सर्व कलावतांची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. या कलावतांना पाहण्यासाठी बावधनमध्ये गर्दी लोटली होती. त्यानंतर मुख्य कार्यक्रमात सर्व कलावतांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन मुळशी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष जितेंद्र गोळे यांनी तर आभार अध्यक्ष विनोद माझिरे यांनी मानले.

Web Title: Sand Pattern After Mulshi Pravin Tarade