जप्त केलेले वाळूचे तीन ट्रक पळविले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

पुणे - अनधिकृत वाळू वाहतूक करणारे पाच ट्रक तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जप्त करून हवेली प्रांत कार्यालयाच्या आवारात लावले. मात्र त्याच दिवशी पाचपैकी तीन ट्रक अज्ञात व्यक्तींनी पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना क्वीन्स गार्डन परिसरात घडली.

या प्रकरणी संतोष चोपदार (वय २८, रा. कोथरूड) यांनी कोरेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोपदार हे तलाठी आहेत. तहसीलदार, तलाठी, कोतवाल यांनी मंगळवारी मध्यरात्री शेवाळवाडी जकातनाका येथे अनधिकृत वाळू वाहतूक करणारे पाच ट्रक ताब्यात घेतले होते. चोपदार यांनी तहसीलदारांच्या आदेशानुसार पाचही ट्रक अल्पबचत भवनाजवळील प्रांत कार्यालयामध्ये लावले. यातील तीन ट्रक अज्ञातांनी पळवून नेले.

Web Title: sand truck seized crime