जुन्नरमधील चंदन चोर जेरबंद 

arrest.jpg
arrest.jpg

जुन्नर (पुणे) : कुसूर- तलाखी (ता. जुन्नर) येथील ठाकरवाडीत चंदन चोरास मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यश मिळविले आहे. 
याप्रकरणी दशरथ सोनबा मोधे (वय ४२) यास या चंदन चोरीप्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्याच्या घराशेजारील पत्राशेडमध्ये छापा घातला असता तिथे चंदनाची लाकडे लपवून ठेवली असल्याचे आढळून आले आहे.

पोत्यात चंदनाच्या लाकडाच्या गाभ्याच्या ढपल्या, एक लोखंडी कुऱ्हाड, एक वाकस, एक गिरमिट, एक स्क्रू ड्रायव्हर, एक लोखंडी कोयता, असा सुमारे २ हजार ७५५ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. तो पंचांसमक्ष जप्त केला. या गुन्ह्याबाबत आरोपीवर जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी व मुद्देमाल जुन्नर पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलिस हवालदार शंकर जम, शरद बाबळे, पोलिस नाईक दीपक साबळे यांच्या पथकाने केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com