गोसावी समाज संस्थेच्या प्रदेशाध्यक्ष पदी संदिप भारती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

शिववंशीय दशनाम गोसावी समाज संस्थेच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी संदिप जालिंदर भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक शिवसंभा गोसावी यांनी ही नियुक्ती केली.
 

मांजरी : शिववंशीय दशनाम गोसावी समाज संस्थेच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी संदिप जालिंदर भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक शिवसंभा गोसावी यांनी ही नियुक्ती केली.

प्रदेश उपाध्यक्ष सूर्यकांत गिरी, जिल्हाध्यक्ष दशरथ गिरी, जिल्हा युवाध्यक्ष पंकज भारती, कार्याध्यक्ष डी. बी. गोसावी, संपर्क प्रमुख बाळासाहेब गोसावी, दत्तात्रय गोसावी,  आदेश गोसावी, रामचंद्र गोसावी, शशिकांत गिरी,  विजय गोसावी, नंदकुमार गोसावी, सुदाम गोसावी, सुरेश गोसावी, रामराजे गिरी, दत्ता गिरी, प्रकाश भारती, भरत भारती, रविंद्र गोसावी उपस्थित होते.

नवनिर्वाचित युवकाध्यक्ष संदिप भारती यावेळी म्हणाले की,"समाजाच्या इनाम जमिनी व मठांचे प्रश्न मार्गी लावणे, दफनभूमीचा प्रश्न सोडविणे आदी प्रमुख कामे करण्यावर माझा भर राहणार आहे. तसेच समाजातील तरुणांचे संघटन मजबूत करायचे आहे.''

Web Title: Sandeep Bharti selected as state President of Gosavi Samaj Society

टॅग्स