शहराजवळील ठाणी आयुक्तालयाला जोडा - संदीप पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

पुणे - शहरीकरण झालेला शहराजवळील भाग पुणे पोलिस आयुक्तालयामध्येच समाविष्ट व्हावा, असा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने लोणी कंद, लोणी काळभोर पोलिस ठाणी पुणे पोलिस आयुक्तालयात समाविष्ट करण्यासंदर्भातचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर पुणे पोलिस आयुक्तालय व ग्रामीण पोलिस दलाच्या हद्दीमध्ये बदल झाला आहे. या विषयी पाटील म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय स्थापन झाल्याने पुणे पोलिस आयुक्तालय व ग्रामीण पोलिस दलाच्या रचनेत बदल झाला आहे. 

लोणी कंद व लोणी काळभोर ही शहरीकरण झालेली गावे आहेत. त्यांच्याप्रमाणेच शहरीकरण झालेली आणखी गावे असून, त्यांचा समावेश पुणे पोलिस आयुक्तलयात करण्याबाबतचा प्रस्ताव आम्ही गृह विभागाकडे पाठविला आहे.’’

गुन्हे शाखेसाठी स्वतंत्र निरीक्षक
जिल्ह्यामध्ये विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांवर ताण येऊ लागला आहे. म्हणूनच आता शहराप्रमाणे ग्रामीण पोलिस दलही प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे शाखेसाठी स्वतंत्र पोलिस निरीक्षक नियुक्त करणार आहे. येत्या दोन दिवसांत त्याबाबतचा आदेश काढण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

चाकण येथे हिंसाचार करणाऱ्यांमध्ये काही जण औद्योगिक कंपन्यांमध्ये काम करणारे, काही जण चाकणजवळील झोपडपट्टीतील, तर काही स्थानिक व मराठवाडा परिसरातील होते. त्यांनी जाळपोळ व गाड्या फोडण्याचे प्रकार केले आहेत. आता हे प्रकरण पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडे आहे. 
- संदीप पाटील, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण

Web Title: Sandip Patil Police Station Commissionerate