जुन्नर - पोस्ट ऑफिसच्या आवारातील चंदनाच्या झाडाची चोरी

दत्ता म्हसकर
मंगळवार, 3 जुलै 2018

जुन्नर (पुणे) : जुन्नरला पोस्ट ऑफिसच्या आवारातील चंदनाच्या झाडाची चोरी झाल्याचे सोमवारी (ता.2) उघडकीस आले आहे. हे ठिकाण जुन्नर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे.

जुन्नर तहसील कार्यालयाच्या आवारात पोस्ट ऑफिस, दूरध्वनी, न्यायालय, पोलीस, वन, महसूल अशी शासकीय कार्यालये आहेत. टपाल कार्यालय व कर्मचारी निवासस्थान यामध्ये असलेले हे पूर्ण वाढ झालेले चंदनाचे जुने झाड चंदनचोरांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास यांत्रिक करवतीने कापले झाडाचा बुंध्याचा चंदनाचा गाभा असणारा भाग घेऊन निरुपयोगी भाग तेथेच टाकून पलायन केले.

जुन्नर परिसरसतील चंदनाच्या झाडांची गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्या यामुळे चंदनाचे झाड दाखविण्यासाठी उरले नाही हे आडबाजूला असलेले झाड हेरून  चोरून नेताना कार्यालया बाहेर असणारे सिसिटीव्हीत आपण येऊ नये अशी दक्षता चंदनचोरांनी घेतली असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोस्टमास्तर जयश्री जाधव यांनी याबाबत जुन्नर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

Web Title: sandle tree stole from post office junnar