सांगवीत संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन

रमेश मोरे
बुधवार, 11 एप्रिल 2018

फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन व नगरसेवक संतोष कांबळे यांच्यावतीने भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

जुनी सांगवी : येथील फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन व नगरसेवक संतोष कांबळे यांच्यावतीने भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे १७ एप्रिल ते १९ एप्रिल येथील एकता चौक चंद्रमणी नगर येथे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मंगळ ता.१७ सप्त खंजिरीचे जनक,समाज प्रबोधनकार,श्री सत्यपाल महाराज यांचे समाजप्रबोधनपर कीर्तन सायं ६:३० वा.होणार आहे. तर बुधवार ता.१८ लोकप्रिय गायक आनंद शिंदे यांच्या भिम गीते व लोकगीतांचा कार्यक्रम होणार आहे.

गुरूवार ता.१९ प्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे. असे नगरसेवक संतोष कांबळे व फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशनचे अमित बाराथे यांनी सांगीतले.

Web Title: Sangavi Sanyukt jayanti Function Organisation