निमसाखरच्या सरपंचपदी संगीता लवटेंची बिनविरोध निवड

राजकुमार थोरात
शनिवार, 1 डिसेंबर 2018

वालचंदनगर (ता.इंदापूर ) : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संगीता सुरेश लवटे यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतीच्या सरपंच अरुणा शामराव चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे सरपंच पद रिक्त झाले होते. शुक्रवार (ता. ३०) सरपंचपदी निवड पार पडली. यामध्ये लवटे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी गिरीश संदीकर व एस. एम. भिलारे यांनी लवटे यांची बिनविरोध सरपंचपदाची निवड जाहिर केली.

यावेळी उपसरपंच गौरी जाधव,माजी उपसरपंच नंदकुमार रणवरे, सदस्य सिंधू घोडके, कांताबाई हुंबे,पांडुरंग पानसरे, विद्या बोंद्रे,रशीद मुलाणी, अनिल रणवरे, हनुमंत खुडे, जयश्री अडसूळ, इंदापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती जयकुमार कारंडे, माजी सरपंच गोविंद रणवरे, युवराज रणवरे, दत्तू चौधरी,अनिल बोंद्रे,संजय जाधव,तुळशीराम महानवर, गजानन सातपुते आदी उपस्थित होते.
 
Web Title: Sangeeta Lavate is Elected as of Nimasarkha's Sarpanch