सांगवी - पिंपळे गुरव मध्ये धनगर समाजाचा मोर्चा

मिलिंद संधान
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

नवी सांगव (पुणे) - सांगवी - पिंपळे गुरव परिसरातील धनगर समाज बांधवांच्या वतीने नुकतेच मार्चाचे आयोजन करण्यात आले होते. धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ठ करण्यासाठी आयोजित केलेल्या या मोर्चात परिसरातील समाज बांधव उपस्थित होते. जुनी सांगवी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच धनगर समाज आरक्षणच्या अंमलबजावणी साठी शहिद झालेल्या युवकांना श्रध्दांजली यावेळी वाहण्यात आली. त्यानंतर अहिल्यादेवींच्या नावाने जयजयकार करीत कायदा व सुव्यस्थेचे पालन करीत मोर्चा पिंपळे गुरवच्या दिशेने निघाला. 

मुख्यमंत्री जागे व्हा...
आरक्षणाचा धागा व्हा, गाजर नको, आरक्षण द्या,  अहिल्यामाता की जय..., दिलेले आश्वासन पुर्ण करा नाहीतर खुर्ची खाली करा... अशा घोषणांनी साईचौक, कृष्णाचौक, काटेपुरम चौकातील परिसर दणानून सोडला. त्यानंतर पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयाजवळ येऊन घोषणाबाजी केली. आमदार जगतापही मोर्चाला सामोरे गेले असता समाजबांधवांचे प्रतिनिधी म्हणून मनोजकुमार मारकड यांनी त्यांना पिवळा पंचा घातला व या धडक मोर्चाचे कारण व नियोजनाची माहिती सांगितली. तसेच निवेदनातील मुद्दे वाचून दाखविले व शासण दरबारी आरक्षणासंदर्भात पाठपुरावा करण्याची विनंती केली. 

आमदार जगताप म्हणाले, " धनगर समाजाचा आरक्षण विषय मला चांगला माहित आहे. स्वातंत्र मिळाल्यानंतर सर्वात जास्त उपेक्षीत धनगर समाज राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री व पक्षाच्या वरिष्ठांकडे मी बाजु मांडणार आहे. "

मोर्चात नगरसेविका आशा शेंडगे - धायगुडे, श्रीगणेश सहकारी बँकेचे अध्यक्ष सुर्यकांत गोफणे, डॉ अतुल होळकर, सचिन सरक, रामेश्वर हराळे, महेंद्र लंभाते, किसन फसके, बाबासाहेब चितळकर, बिरू व्हनमाने, अभिमान्यू गाडेकर कोकरे व सांगवी पिंपळेगुरव परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थितित होते.

Web Title: Sangvi - Dhangar Community Front in Pimpale Gurav