सांगवी जिल्हा रूग्णालयासमोरील भुयारी पदपथाची दुरावस्था

रमेश मोरे
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

जुनी सांगवी - जुनी सांगवी सांगवी फाटा येथील जिल्हा रूग्णालया समोरून बिआरटी मार्गाकडे जाणा-या भुयारी मार्गावर सांडपाणी, कचरा व अस्वच्छतेमुळे दुरावस्था झाली आहे. भुयारी मार्गाच्या भिंतीतुन सांडपाणी झिरपत असल्याने नागरीकांना कुबट दुर्गंधी सोबतच पाण्यातुन मार्गक्रमण करावे लागत आहेत. याच बरोबर नागरीकांकडुन टाकलेला कचरा, रस्त्यावरील हवेने आलेला कचरा यामुळे या भुयारी पदपदथात अस्वच्छता पसरली आहे. औंध व सांगवी कडुन येजा करण्यासाठी या भुयारी मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरीकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

जुनी सांगवी - जुनी सांगवी सांगवी फाटा येथील जिल्हा रूग्णालया समोरून बिआरटी मार्गाकडे जाणा-या भुयारी मार्गावर सांडपाणी, कचरा व अस्वच्छतेमुळे दुरावस्था झाली आहे. भुयारी मार्गाच्या भिंतीतुन सांडपाणी झिरपत असल्याने नागरीकांना कुबट दुर्गंधी सोबतच पाण्यातुन मार्गक्रमण करावे लागत आहेत. याच बरोबर नागरीकांकडुन टाकलेला कचरा, रस्त्यावरील हवेने आलेला कचरा यामुळे या भुयारी पदपदथात अस्वच्छता पसरली आहे. औंध व सांगवी कडुन येजा करण्यासाठी या भुयारी मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरीकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. काही महाभाग या मार्गात लघुशंकाही करत असल्याने सर्वसामान्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

भुयारी मार्गाच्या प्रवेशाजवळ झाडाच्या फांद्याचा अडथळा-
रूणालयाच्या बाजुने भुयारी मार्गातुन प्रवेश करतानाच शेजारी असलेल्या बाभळीच्या झाडाच्या फांद्याची वाढ होवुन त्या प्रवेश मार्गावरच आडव्या आल्याने रहदारीसाठी अडथळा ठरत आहेत. नागरीकांना फांद्या चुकवत येथुन वाकुन जावे लागत आहे. रात्री फांद्या नजरेस न आल्याने नागरीक फांद्याना अडखळुन पडल्याच्या घटनाही येथे घडल्या आहेत.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा वावर-
अनेक दांडी बहाद्दर महाविद्यालयीन तरूण तरूणी या बोगद्याचा आश्रय घेत येथे टवाळक्या करताना नागरीकांच्या निदर्शनास येतात. अडगळीचा रस्ता असल्याने दुपारच्या वेळेत  या परिसरात विद्यार्थी रेंगाळताना दिसतात. येथे महाविद्यालयीन तरूण तरूणींचा  वावर वाढल्याने येथे काही अनुचित प्रकार घडु नये यासाठी येथे प्रतिबंध करून पोलिस प्रशासनाने लक्ष द्यावे अशी नागरीकांमधुन मागणी होत आहे. याबाबत आरोग्य विभागाशी संपर्क केला असता संपर्क होवु शकला नाही.

येथील झाडाच्या फांद्या, भुयारी मार्गातील स्वच्छता, दुरूस्तीबाबत सबंधित विभागाला कळविले आहे. तसेच रूग्णालय परिसर, व अशा सार्वजनिक ठिकाणी पोलिस प्रशासनाकडुन येथे लक्ष देण्याबाबत पत्र देणार आहे.
संतोष कांबळे- नगरसेवक जुनी सांगवी प्रभाग क्रं ३२

Web Title: sangvi foothpath needs to have repairing work