सांगवीतील तनिष्का करताहेत एलईडी माळा

रमेश मोरे
रविवार, 26 ऑगस्ट 2018

जुनी सांगवी येथे सकाळ तनिष्का स्त्री प्रतिष्ठा व्यासपीठाच्या वतीने येथील तनिष्का सण उत्सवात लागणाऱ्या ईलेक्ट्रीक एलईडी दिव्यांच्या शोभेच्या माळा तयार करत आहेत.
 

जुनी सांगवी- जुनी सांगवी येथे सकाळ तनिष्का स्त्री प्रतिष्ठा व्यासपीठाच्या वतीने येथील तनिष्का सण उत्सवात लागणाऱ्या ईलेक्ट्रीक एलईडी दिव्यांच्या शोभेच्या माळा तयार करत आहेत.

येणाऱ्या गौरी गणपती, नवरात्र महोत्सव, दिवाळी या सणांमध्ये महिलांना अर्थार्जन करता यावे. त्यांनी व्यवसायात उतरावे या उद्देशाने सकाळ समुहा मार्फत सांगवी येथील तनिष्का महिला गट समुह एलईडी माळा तयार करण्याचे काम करत आहेत. शनिवार ता.25 प्रशिक्षिका प्रतिमा उंडे सकाळ तनिष्काचे संचालक डी.आर.कुलकर्णी यांनी जुनी सांगवी संगमनगर महिलांना एलईडी लाईट माळा बनविण्याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन केले.

यावेळी कुलकर्णी म्हणाले की, आपल्याच भागात तनिष्का या उद्योगात उतरल्यास परिसरातील बाजारपेठेत व नागरीकांना कमी किमतीत दर्जेदार माल घेता येईल. याचबरोबर महिलांना उद्योग व्यवसायातुन कुटुंबासाठी अर्थार्जन करता येईल. कच्चा माल, मार्केटिंगबाबत तनिष्कांचा उत्साह वाढुन त्या स्वावलंबी बनतील. यावेळी गट समन्वयक राधिका घोडके यांनी म्हणाल्या, सांगवी परिसरात सध्या तीन गटाच्या महिला या कामात आल्या आहेत. महिलांना समुहातुन व व्यक्तिगतरित्या घर सांभाळुन हे काम करता येते.महिलांमधे या कामात उत्साह आहे. गौरी -गणपती, दसरा दिवाळी सण, उत्सवात आमच्या एलईडी माळा बाजारात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. गटप्रमुख शितल शितोळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. यावेळी तनिष्का गटाच्या स्नेहल लयगुडे,धनिता सुतार,कविता बिराजदार,योगिता पाटिल, पौर्णिमा ताम्हणकर, हेमा कदम, ज्योती पाटिल, अहिल्या शितोळे, सुजाता निकाळजे उपस्थित होत्या. जयश्री मदनवार यांनी आभार मानले.

Web Title: in sangvi tanishka made LED lamps