सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट इकोफ्रेंडली (व्हिडिओ)

अभिषेक मुठाळ
सोमवार, 16 जुलै 2018

पुणे - सॅनिटरी नॅपकिनचा कचरा संपविण्यासाठी पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध झाला आहे. वडोदरा येथील श्‍यामसुंदर बेडेकर या मराठी माणसाने यासाठी बनविलेल्या या यंत्राला ‘मिनी अशुद्धीनाशक’ असे नाव दिले आहे. हे उपकरण टेराकोटा म्हणजेच कुंडी बनवितात त्या मातीपासून बनविले होते. त्यानंतर त्यांनी हे यंत्र काँक्रिट वापरून बनवले. हे उपकरण छोटे असल्याने शहर आणि ग्रामीण भागात वापरायला सोपे आहे. वनराईच्या ३२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित प्रदर्शनात वसुंधरा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हे यंत्र ठेवण्यात आले होते.

चिमणीच्या आकाराशी साधर्म्य असलेल्या या उपकरणात मधोमध असलेल्या कॉईलवर वापरलेला सॅनिटरी नॅपकिन ठेवून कॉईलखाली पाला, पाचोळा वापरून जाळ केल्यावर नॅपकिनची विल्हेवाट लागेल.  खेडेगावात या नॅपकिनची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया-यंत्रणा नाही. शहरात इन्सिनेटर वापरण्यात येतात. पण त्यात नॅपकिन जाळताना तापमान ४७० अंश सेल्सिअसपर्यंत जाते.

यासाठी वीजेचा खर्च वाढतो. वापरलेल्या नॅपकिनमधील प्लॅस्टिक विषारी वायू सोडतात. या यंत्रासाठी जागा मिळविणेही अवघड जाते. त्यामुळे हे नवे उपकरण परिणामकारक ठरेल.

मिनी अशुद्धीनाशक उपकरणाचे तापमान ३०० अंश सेल्सिअसच्यावर जात नाही. त्यामुळे यातून विषारी वायू तयार होत नाहीत; तसेच पॉलिमरचे विघटन होत नाही. त्यामुळे हे यंत्र पर्यावरणपूरक आहे.
- श्‍यामसुंदर बेडेकर, उद्योजक 

आम्ही मुलींच्या सक्षमीकरणाविषयी काम करतो. सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्‍न या उपकरणामुळे सुटला आहे. 
- रागिणी पाटील, प्रकल्प अधिकारी, वसुंधरा चॅरिटेबल ट्रस्ट 

Web Title: Sanitary Napkin Disposal