सॅनिटरी नॅपकिन वापराची ‘प्रेरणा’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

माले - आजही शिक्षणाचा अजिबात गंध नसलेल्या आदिवासी कातकरी समाजातील मुली आणि महिलांना त्यांच्या आरोग्यासाठी सॅनिटरी नॅपकिन वापरण्यास प्रवृत्त करणारा ‘प्रेरणा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्या अंतर्गत मुळशी तालुक्‍यातील कातकरी वस्तीवर जाऊन सॅनिटरी नॅपकिन वापराबाबतचे महत्त्व पटवून दिले जात आहे. मोफत नॅपकिनही पुरविले जात आहेत. 

माले (ता. मुळशी) येथील पोलिस पाटील शारदा विनोद दातीर या गेल्या तीन वर्षांपासून मुळशी तालुक्‍याच्या दुर्गम भागातील आदिवासींकरीता काम करत आहेत. पुण्यातील गुरुकुल शिक्षण संस्थेच्या बीबीएनएस स्कूलमार्फत ‘आनंद कुटी’ उपक्रमांतर्गत कातकरी कुटुंबांना धान्य आणि इतर गरजेच्या वस्तूंची मदत त्या करतात. त्याचदरम्यान या आदिवासींच्या विविध समस्यांची त्यांना माहिती झाली. आदिवासी महिला आणि मुलींमध्ये मासिक पाळीबाबत अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा असल्याचे त्यांना दिसले. ‘पॅड मॅन’ चित्रपटातून ‘प्रेरणा’ घेऊन त्यांनी याबाबत काम करण्याचे निश्‍चित केले.दातीर यांनी ‘बीबीएनएस’ स्कूलमार्फत महिला दिनी ‘एक हात आरोग्यासाठी’ हा उपक्रम सुरू केला. 

सुरवातीला सॅनिटरी नॅपकिन वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासही नकार देणाऱ्या मुलींनी कार्यक्रमाच्या शेवटी न लाजता मोकळेपणाने संवाद साधला. सर्वांसोबत फोटोही काढून घेतले. तसेच सॅनिटरी नॅपकिन वापराचा निश्‍चय केला. 
 - शारदा दातीर, पोलिस पाटील, माले 

Web Title: sanitary napkin use tribal women