हडपसर येथे सुरू होणार सॅनटरी वेस्ट प्रकल्प

सॅनिटरी वेस्टवर प्रक्रिया करणारा प्रकल्प हडपसर येथे सुरू करण्याच्या प्रस्तावास हडपसर परिसरातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोध केला.
sanitary pads garbage
sanitary pads garbageSakal
Summary

सॅनिटरी वेस्टवर प्रक्रिया करणारा प्रकल्प हडपसर येथे सुरू करण्याच्या प्रस्तावास हडपसर परिसरातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोध केला.

पुणे - सॅनिटरी वेस्टवर प्रक्रिया (Sanitary Waste Project) करणारा प्रकल्प हडपसर (Hadapsar) येथे सुरू करण्याच्या प्रस्तावास हडपसर परिसरातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोध केला. आमच्याकडे सगळे कचरा प्रकल्प देता मेट्रो का देत नाही? असा पवित्रा या नगरसेवकांनी घेतला. त्यामुळे अखेर भाजपने बहुमताच्या जोरावर विषय मंजूर केला. तर काँग्रेस व शिवसेनेने तठस्थ भूमिका घेतली. (Sanitary waste project to be started at Hadapsar)

महापालिकेच्या घनकचरा विभागाने हडपसर येथे सॅनटरी कचऱ्याची शास्त्रोक्तपध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रॉक्टर अँड गॅम्बल या कंपनीकडून २५ कोटी रुपये खर्च करून प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने रामटेकडी येथील इंडस्ट्रिअल इस्टेटमधील अडीच एकर जागा देण्याचा प्रस्ताव मुख्यसभेसमोर ठेवला होता. गेल्या महिन्यातही या विषयाला विरोध झाल्याने तो महिनाभार पुढे ढकलला. पण यावेळी भाजपने तो मंजूर करण्याचे निश्‍चीत केले होते. दरम्यान या प्रकल्पाला तीन वर्ष पूर्णझाल्यानंतर महापालिकेला दरवर्षी पैसे द्यावे लागणार आहेत, पण त्याचा निर्णय महापालिका आयुक्त घेतील असे प्रस्तावात नमूद केले होते. त्यावर नगरसेवक अरविंद शिंदे यांनी आक्षेप घेत हा अधिकार स्थायी समिती आणि मुख्यसभेचा आहे. त्यामुळे तीन वर्षानंतर पुन्हा आमची मान्यता घ्या अशी मागणी केली. ही मागणी भाजपने मान्य करत तशी उपसूचना दिली.

sanitary pads garbage
तळेगावात तरुणाचा डोक्यात घाव घालून खुन

हा प्रस्ताव मंजूर होत असताना अचानक राष्ट्रवादीच्या हडपसर भागातील नगरसेवकांनी विरोध सुरू केला.

नगरसेविका वैशाली बनकर म्हणाल्या, ‘महापालिकेत एसीमध्ये बसून तुम्ही निर्णय घेता, पण तुम्हाला हडपसरची स्थिती माहिती नाही, त्यामुळे हा कचरा प्रकल्प आम्ही मंजूर करणार नाही. जसा आमच्याकडे कचरा पाठवता तशी मेट्रोही पाठवा.

हडपसर भागातच कचऱ्याचेच प्रकल्प येत आहेत. त्यामुळे आमचा विरोध आहे, असे नगरसेवक योगेश ससाणे यांनी सांगितले. प्रशांत जगताप, सुभाष जगताप यांनीही यास विरोध केला. अखेर भाजपने मतदान घेण्याची सूचना नगरसचिवांना करून बहुमताच्या जोरावर विषय मंजूर केला.

काँग्रेसमध्ये निर्णयाचा गोंधळ

तीन वर्षानंतर या प्रकल्पाचे पुनरावलोकन करण्याचा अधिकार प्रशासनाने आयुक्तांकडे ठेवला होता, काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांच्या उपसूचनेमुळे हा अधिकार स्थायी समिती व मुख्यसभेला मिळाला. असे असले तरी काँग्रेसेचे गटनेते आबा बागूल यांनी अचानक तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यावेळी आपली उपसूचना आहे, त्यामुळे त्यास पाठिंबा दिला पाहिजे असे सांगितले तरीही बागूल यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे मुख्यसभेत काँग्रेसमधील गोंधळ पुन्हा एकदा समोर आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com