पुणे मनपा नाव समिती उपाध्यक्षपदी संजय घुले

समीर तांबोळी
बुधवार, 13 जून 2018

पुणे महापालिका नाव समिती उपाध्यक्षपदी हडपसर महमंदवाडीचे नगरसेवक संजय घुले यांची निवड करण्यात आली. महापौर मुक्ता टिळक यांनी ही निवड केली.

महंमदवाडी (पुणे): पुणे महापालिका नाव समिती उपाध्यक्षपदी हडपसर महमंदवाडीचे नगरसेवक संजय घुले यांची निवड करण्यात आली. महापौर मुक्ता टिळक यांनी ही निवड केली.

महापालिकेत झालेल्या सर्वसाधारण सभेत नाव समिती अध्यक्ष पदी महेश लडकत तर उपाध्यक्ष पदी घुले यांची निवड केली. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष जगदीश मुळीक, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, गटनेते वसंत मोरे, अरविंद शिंदे, अशोक हरणावळ आणि इतर नगरसेवक उपस्थित होते.

संजय घुले यांच्या माध्यमातून प्रथमच महमंदवाडी प्रभागातून निवडून आल्याने भाजपचे खाते उघडले. श्री. घुले यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या काळात महिलांना स्वयंरोजगार तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन गरजूंना आर्थिक मदत देण्याचे काम केले आहे, त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली आहे.

Web Title: Sanjay Ghule, Deputy Chairman on pune Municipal Committee