शिवसेनेचा पोपट त्यांचाच पोपटामुळे झाला : संजय काकडे

Sanjay Kakade Comment on Shiv Sena After Formation of Government.jpg
Sanjay Kakade Comment on Shiv Sena After Formation of Government.jpg

पुणे : 'गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री अशी चर्चा जोमात चालू होती. परंतु आज सकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ विधी पार पडला. त्यांनतर '' शिवसेनेचा पोपट त्यांचाच पोपटामुळे झाला, अशी टिका भाजपचे नेते, खासदार संजय काकडे यांनी केली आहे

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
''सत्ता नेमकी कोणाची असा प्रश्‍न राज्यात असताना देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री पद मिळाले आहे. एकीकडे महाआघाडीचे सरकारस्थापन होण्याआधीच राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी डाव बदलला. या सर्व घडामोडींना उत्तर देत संजय काकडे यांनी अजित पवार यांचे आभार मानले.

"राष्ट्रवादी काँग्रेसचे, अजित पवारांचे आभार मानतो. त्यांनी भाजपला पाठींबा देत काल रात्री 56 आमदारांचं पत्र घेऊन आज सकाळी शपथ विधी पार पाडला. मला खात्री आहे की, ही अघाडी पुढील पाच वर्षे टिकेल. तसेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघे चांगले सरकार चालवतील.'', असे मत संजय काकडे यांनी वर्तवले. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात अगोदरही वाद झाले. पण हा वाद देखील जास्त काळ टिकणार नाही, असे काकडे यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com