संजय राऊत यांच्याकडूनही बाळासाहेबांची तुलना शिवाजी महाराज यांच्याशी

सागर आव्हाड
Wednesday, 15 January 2020

भाजपवर टीकेची झोड

- लेखातही उल्लेख

पुणे : भाजप नेते जय भगवान गोयल यांनी एका पुस्तकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. त्यावरून वादंग निर्माण झाला आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील सामनामधून तसेच स्वतःच्या ब्लॉगद्वारे बाळासाहेब ठाकरे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याचे आता समोर आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संजय राऊत यांच्या सर्व लेखांचे एकत्रित 'युगान्त' हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेखही एकेरी करण्यात आला आहे. 

Image may contain: text that says "परस्परविरोधी कोडे होते. त्यांच्या जाण्याने हिमालय पर्वत ढासळला आहे, सह्याद्रीचे कडे कोसळले आहेत. हिंदुस्थानच्या जनतेने एक अत्यंत मौल्यवान खजिना गमावला आहे. महाराष्ट्राने त्यांचा दुसरा शूर शिवाजी गमावला आहे यातच सर्व आले. हिंदुस्थानच्या इतिहासात जनतेने एकाच व्यक्तीवर प्रेमाचा एवढा केल्याचा दाखला सापडणार नाही. बाळासाहेबांनी हिमालयाइतकेच मोठे केले. आज सह्याद्रीची ओळख हरवली आहे. (संजय उवाच, २३ २०१२)"

"शिवसेनाप्रमुखांकडे पाहायला लागलो म्हणजे एकदम शिवाजी दिसायला लागायचे, अशाप्रकारे बाळासाहेब ठाकरे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. तसेच 23 नोव्हेंबर 2012 रोजी संजय राऊत यांनी 'संजय उवाच' असा लेख लिहिला आहे.

Image may contain: text

बाळासाहेबांच्या मृत्यूचे वर्णन त्यात करताना शिवाजी महाराजांची उपमा संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुखांना दिली होती. त्यामध्ये संजय राऊत यांनी लिहिले, की महाराष्ट्राने त्यांचा दुसरा शूर शिवाजी गमावला आहे. यातच सर्व आले. 'युगान्त' पुस्तकाच्या पान क्र. 88 वर संजय राऊत यांनी हे लिहिले आहे.

मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणारे जय भगवान गोयल आहेत कोण?

याशिवाय अयोध्येतील राममंदिराची जागा, रायगडावरील शिवाजी महराजांच्या समाधीस्थळाची जागा आणि शिवतीर्थावरील बाळासाहेबांचे समाधीस्थळ या जागांचे पावित्र्य सारखेच आहे, असाही त्यामध्ये उल्लेख आहे.

Image may contain: text that says "होते. शिवसेनाप्रमुखांकडे पाहायला लागलो म्हणजे एकदम शिवाजी दिसायला लागायचे. यमराजा, तूच खरे सांग. महाराजांचा पण शिवाजी खरेच गेले काय? ते अधिक तेजाने महाराष्ट्रातल्या मनामनांत लोकमान्य टिळकांचेही तेच झाले आणि आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतीतही तेच घडणार आहे. यमराजा, तू स्वतःलाच फसवले आहेस. चितेवरच्या व धुलिकणांतून असंख्य बाळासाहेबांनी महाराष्ट्रात अवतार घेतला आहे. दुःख आहे, वेदना आहेत, अश्रू आहेत, हुंदके आहेत.. महाराष्ट्राच्या मातीत शोक आहे. शोक गेलेल्या देहासाठी करा. विचारांचे अमरत्व आपल्यात आहे. म्हणूनच मराठी जनहो, लोकमान्यांच्या वियोगानंतर युगान्त"

भाजपवर टीकेची झोड

दिल्लीतील काही भाजप कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी आणि शिवाजी महाराज यांची थेट तुलना झाल्याने भाजपवर टीका केली जात आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा संजय राऊत यांनीही दिली होती, हे खूप कमी जणांना ठाऊक असेल. यावरून नवीन वाद आता सुरू झाला.

लेखातही उल्लेख

संजय राऊत यांनी लिहिलेल्या लेखातही बाळासाहेब ठाकरे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. संजय राऊत यांनी लिहिलेला हा लेख 20 नोव्हेंबर 2012 मध्ये प्रसिद्ध झाला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Raut also Compared Bal Thackeray with Chhatrapati Shivaji Maharaj