संप मिटवायचा आहे की नाही?: संजय राऊत

वृत्तसंस्था
बुधवार, 7 जून 2017

मध्यावधी निवडणूक हेच सरकारचे काम राहिले आहे का? इतर सगळे प्रश्न संपले का? शेतकर्‍यांना द्यायला पैसे नाहीत; मग सत्तेसाठी किती खाली वाकणार आहात?

 

पुणे - शेतकरी संपाचा प्रश्‍न सोडवायचा आहे; की चिघळत ठेवायचा आहे, अशी गर्भित विचारणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज (बुधवार) सरकारला केली. कर्जमाफीची चर्चा शिवसेनेला वगळून करण्यासंदर्भातील प्रश्‍नास उत्तर फ्देताना राऊत यांनी सरकारला हा इशारा दिला.

राऊत यावेळी म्हणाले -

कर्जमाफीची चर्चा शिवसेनेला वगळून करणार आहात का? राज्यातला प्रश्न सोडवायचा आहे, चिघळत ठेवायचा नाही, हे लक्षात घ्या

शेतकर्‍यांची कर्जमाफी करायलाच पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत नसताना केली होतीच

मध्यावधी निवडणूक हेच सरकारचे काम राहिले आहे का? इतर सगळे प्रश्न संपले का? शेतकर्‍यांना द्यायला पैसे नाहीत; मग सत्तेसाठी किती खाली वाकणार आहात?

'सामना'च्या अग्रलेखातून परखडपणे सत्य मांडणे म्हणजे 'टीका करणे' असे नाही 

शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाविषयी चर्चा केली की शेतकर्‍यांच्या संपावर, हे कुणालाच माहीत नाही 

राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात मतभेद राहू नयेत

कर्जमाफीचे श्रेय घ्यायचे असेल, तर मुख्यमंत्र्यांनी खुशाल घ्यावे. पण शेतकर्‍यांना कर्जमाफी द्यावी 

Web Title: sanjay raut warns government