दक्षिण मुख्यालयाच्या संचालकपदी संजीव कुमार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

पुणे - लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या संचालकपदी संजीव कुमार यांची नियुक्ती झाली आहे. देशातील पाच प्रमुख कॅंटोन्मेंटच्या मुख्य कार्यकारी पदासह संरक्षण मंत्रालयाच्या मालमत्ता विभागाची महत्त्वपूर्ण जबाबदारी कुमार यांनी यापूर्वी पार पाडली आहे. 

पुणे - लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या संचालकपदी संजीव कुमार यांची नियुक्ती झाली आहे. देशातील पाच प्रमुख कॅंटोन्मेंटच्या मुख्य कार्यकारी पदासह संरक्षण मंत्रालयाच्या मालमत्ता विभागाची महत्त्वपूर्ण जबाबदारी कुमार यांनी यापूर्वी पार पाडली आहे. 

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आदेशानंतर कुमार यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. पुणे कॅंटोन्मेंटचे सीईओ असताना कुमार यांनी कॅंटोन्मेंटमध्ये "नो हॉर्न झोन', "स्वच्छ कॅंटोन्मेंट', अतिक्रमणमुक्त कॅंटोन्मेंट यांसारखे वैविध्यपूर्ण प्रयोग राबविले. त्यांच्या कार्यकाळातच विशेष मुलांच्या "झेप' या संस्थेला राष्ट्रीय पातळीवर गौरव प्राप्त झाला. याबरोबरच अनधिकृत व्यवसाय, बांधकामे व अन्य गैरप्रकारांनाही आळा घालण्यासह घोरपडी येथील उड्डाण पूल व अन्य विकासकामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. 

पुणे, खडकी, कॅनरोल (केरळ), मोरार (ग्वालियर) अशा वेगवेगळ्या कॅंटोन्मेंटचे "सीईओ' म्हणून त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. पुणे कॅंटोन्मेंटचे "सीईओ' म्हणून काम पाहताना त्यांची संचालकपदी नियुक्ती झाली. दक्षिण मुख्यालयांतर्गत 27 कॅंटोन्मेंट बोर्ड, 11 मालमत्ता विभाग कार्यालये येतात. सध्या चार संचालक कार्यरत आहेत. कुमार म्हणाले, ""कामकाजाचे वाटप अजून झाले नाही. मात्र कॅंटोन्मेंट बोर्ड व मालमत्ता विभागाच्या समस्यांची मला चांगली माहिती आहे. त्यामुळे हे प्रश्‍न आणि मिळालेली जबाबदारी पार पाडण्यास माझे प्राधान्य असेल.'' 

Web Title: Sanjeev Kumar, director of the South headquarters