जो शिष्यही घडवतो तो खरा कलाकार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

पुणे - ""गायन-वादनाच्या मैफली करतच जो शिष्यही घडवतो तो खरा कलाकार'', असे मत ज्येष्ठ व्हायोलिनवादक उस्ताद फय्याज हुसेन खॉं यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. 

पुणे - ""गायन-वादनाच्या मैफली करतच जो शिष्यही घडवतो तो खरा कलाकार'', असे मत ज्येष्ठ व्हायोलिनवादक उस्ताद फय्याज हुसेन खॉं यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. 

संजोग संगीत महोत्सवात ज्येष्ठ तबलावादक उस्ताद हशमत अली खॉं आणि बासरीवादक पं. रोणू मुजुमदार यांना "पं. संजोग कुचेकर कलागौरव पुरस्कार' फय्याज हुसेन खॉं यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. उद्योजक हुकमीचंद चोरडिया, राजकुमार चोरडिया, संतूरवादक धनंजय दैठणकर, उस्ताद अन्वर हुसेन उपस्थित होते. 
खॉं म्हणाले, ""बुजुर्गांची आठवण ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला वेगळा अर्थ आहे. अशा महोत्सवातून वेगवेगळे कलाकार घडायला हवेत.'' पं. मुजुमदार म्हणाले, ""बुजुर्ग लोक जवळ असले की वेगळीच प्रेरणा मिळते. त्यांच्यामुळेच आपल्यातील कमीपणा काय, हेही कळतो.'' महोत्सवाची सांगता मुजुमदार यांच्या सुरेल बासरी वादनाने झाली. त्यांनी आपल्या वादनातून सरस्वती राग खुलवला. त्यांचे पुत्र सिद्धार्थ मुजुमदार आणि हरिदत्त शर्मा यांनी बासरीवर तर तबल्यावर उस्ताद अक्रम खान यांनी त्यांना साथ केली. मंगेश वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: sanjog sangeet mahotsav