मकर संक्रांतीच्या सणाचा गोडवा वाढविणाऱ्या तिळाच्या उत्पादनावरच संक्रांत

Sesame
Sesame

पुणे - अनेक खाद्यपदार्थांबरोबरच मकर संक्रांतीच्या सणाचा गोडवा वाढविणाऱ्या तिळाच्या उत्पादनावरच संक्रांत लोटलीय. देशभरात लागवड क्षेत्र कमी झाल्याने उत्पादनात तब्बल २५ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. परिणामी, बाजारात तीळ भलताच भाव खाऊ लागलाय. 

गरजेपेक्षा उत्पादन कमी
देशांतर्गत तिळाची गरज सुमारे पाच लाख मेट्रिक टन आहे. यंदा ४ लाख ३९ हजार मेट्रिक टन उत्पादन झाले आहे. तिळाला सध्या दर्जानुसार प्रतिकिलो १०० ते १४० रुपये भाव मिळत आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आणि ओडिशा राज्यात तिळाचे उत्पादन घेतले जाते. यंदा पावसामुळे उत्पादनात घट झाली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असा होतो प्रवास
भारतात उत्पादित होणाऱ्या एकूण तिळापैकी ५० टक्के तीळ हा निर्यातीसाठी पिकवला जातो. उर्वरित तीळ आपल्याकडेच वापरला जातो. याशिवाय आपण सुदान, नायजेरिया, टागो या देशांतून तिळाची आयात करतो. मात्र तो तीळ कमी दर्जाचा असतो. त्याच्यावर आपण प्रक्रिया करून तोच निर्यात करतो.

भारतातील एकूण उत्पादनाच्या तुलनेत चौपट उत्पादन आफ्रिका खंडातील देशांमध्ये घेतले जाते. तिळाचे तेल तयार करून त्याची विक्री केली जाते. आरोग्याला पोषक असल्यामुळे तिळाला वर्षभर मागणी असते. यामुळे तिळाच्या दरातील तेजी कायम असते.
- अजित बोरा, व्यापारी 

१३७ देशांमध्ये निर्यात 
भारतातून दक्षिण कोरिया, साउथ कोरिया, यूएसए, व्हिएतनाम, रशिया, नेदरलॅंड, जर्मनी, तैवान, ग्रीस, इराण आणि इंडोनेशिया यांसह १३७ देशांमध्ये तिळाची निर्यात केली जाते. 

आरोग्यासाठी पोषक
आरोग्यकारक लोह, कॉपर, व्हिटॅमिन बी ६ हे घटक पांढऱ्या तिळातून मिळतात. यामुळे रक्तपेशी तयार होऊन शरीराचे कार्य सहजपणे होते. हाडे मजबूत आणि निरोगी बनवण्याचे गुणधर्म काळ्या तिळामध्ये असल्याचे जाणकारांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com