यावेळची संक्रांत जास्तच गोड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

पिंपरी- मकर संक्रांत हा तसा महिलांचा सण. यादिवशी त्या ओवसा म्हणून वानसामानाची देवाणघेवाण करतात. मात्र, यावर्षीची संक्रांत ही महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच आल्याने ती अतिशय मोठ्या प्रमाणावर अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरीत्याही साजरी झाली. सोशल मीडियावर, तर शुभेच्छांचा पाऊस पडला.

तीळगूळ घ्या, गोड गोड बोला, हे संदेश एवढ्या मोठ्या प्रमाणावर फिरले की, त्याचा अतिरेकच झाला. प्रत्यक्ष शुभेच्छाही मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या. त्याजोडीने महिलांना इच्छुक महिला उमेदवारांकडून ओवसण्याच्या कार्यक्रमानंतर चांदीचा करंडा, नथनी, स्टीलचे भांडे आदी भेटवस्तू देण्यात आल्या.निवडणूक असल्याने पुरुषांनीही महिलांच्या जोडीने संक्रांतीच्या जोरदार शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यामुळे यावर्षीची संक्रांत महिलांबरोबर पुरुषांनाही मोठ्या शुभेच्छा देणारी ठरल्याने गोड ठरली. मात्र ती कोणत्या पुरुष वा महिला शुभेच्छूकाला गोड किंवा आंबट ठरणार हे पुढील महिन्यात 23 तारखेला पालिका निवडणूक निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

Web Title: sankranti becomes sweeter this years