संस्कार ग्रुपचा तपास ‘आर्थिक गुन्हे’कडे

रवींद्र जगधने
मंगळवार, 17 एप्रिल 2018

पिंपरी - दामदुप्पट व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या संस्कार ग्रुपचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला आहे. विशेष पथकामार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आतापर्यंत तीनशेहून अधिक गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या असून, फसवणुकीची रक्कम १४ कोटींच्या पुढे पोचली आहे. तर या प्रकरणात फॉरेन्सिक तज्ज्ञ व ऑडिटरची नेमणूक करण्यात येणार आहे. भरघोस कमिशन लाटणारे सुमारे २० एजंटही पोलिसांच्या रडारवर आहेत.  

संस्कार ग्रुपविरोधात दिघी पोलिस ठाण्यात जानेवारी २०१७ मध्ये एका गुंतवणूकदाराच्या तक्रारीवरून एमपीआयडी कायद्यानुसार पहिला गुन्हा दाखल झाला. या तक्रारीत फसवणुकीची रक्कम सुमारे २५ लाख होती. या प्रकरणी संस्थापक वैकुंठ कुंभार, राणी कुंभार यांचा सत्र व उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने ते अद्याप फरार आहेत. मात्र त्या वेळी संस्कार ग्रुपचे पदाधिकारी राजू बुचडे, अभिषेक घारे व सुरेखा शिवले यांचा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तर नुकतीच अटक झालेल्या संस्कारच्या पदाधिकारी कमल शेळके या अद्यापही कारागृहात आहेत. 

फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पुढे येऊन आर्थिक गुन्हे शाखेच्या (साधू वासवानी चौकाजवळ, पुणे) वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील कलगुटकर यांच्याकडे तक्रार करावी. असे आव्हान पोलिसांनी केले आहे.

दृष्टिक्षेपात
 १९ मालमत्ता जप्त, अनेक मालमत्तेवर बॅंकांचे कर्ज
 पोलिस करणार कर्ज देणाऱ्या बॅंकांकडे चौकशी
 तपास पथकात तीन अधिकारी व सहा कर्मचारी
 पदाधिकाऱ्यांचा जामीन रद्दसाठी अर्ज.
 भरघोस कमिशन लाटणारे २० एजंट रडारवर
 एजंटाची कमिशन परत करण्याची तयारी.
 फॉरेन्सिक लॅबमध्ये संगणक हार्ड डिक्‍सची तपासणी
 फॉरेन्सिक तज्ज्ञ व ऑडिटरची होणार नेमणूक

अनेक एजंटची चौकशी सुरू आहे. तर मुख्य आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली जाणार आहे. गुंतवणूकदारांनी जबाब नोंदविणे गरजेचे आहे. 
- सुनील कलगुटकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा 

Web Title: sanskar group inquiry Financial offenses