'पालखी महामार्गामध्ये जमीन जाणाऱयांना नुकसान भरपाई देणार'

राजकुमार थोरात
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

वालचंदनगर (पुणे): संत तुकाराम महाराज पालखी महामार्गामध्ये जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दर एकराऐवजी गुंठ्यावरती देण्यात येणार असून, शेतकऱ्यांना जास्तीजास्त नुकसान भरपाई देण्यासाठी  प्रयत्न करणार असल्याची माहिती प्रांतधिकारी हेमंत निकम यांनी दिली.

वालचंदनगर (पुणे): संत तुकाराम महाराज पालखी महामार्गामध्ये जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दर एकराऐवजी गुंठ्यावरती देण्यात येणार असून, शेतकऱ्यांना जास्तीजास्त नुकसान भरपाई देण्यासाठी  प्रयत्न करणार असल्याची माहिती प्रांतधिकारी हेमंत निकम यांनी दिली.

लासुर्णे (ता. इंदापूर) येथे संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या संबधित हरकतीवरील सुनावनीच्या वेळी बोलत होते. लासुर्णे, बेलवाडी, जाचकवस्ती परीसरातील शेतकरी यावेळी उपस्थित होते. यावेळी निकम यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना जास्तीजास्त दर कसा मिळेल यासाठी प्रशासन व शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. जिरायती जमिनीला ही बागायती जमिनीप्रमाणे समान दर देण्याचा विचार सुरु आहे. प्रत्येक गावानूसार दरामध्ये थोड्याफार प्रमाणात फरक पडणार आहे. महामार्गाच्या हद्दीमध्ये येणारी बांधकामाचे ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान होत असल्यास संबधित व्यक्तिला संपूर्ण बांधकामचे पैसे देण्यात येणार आहेत. ज्या शेतकऱ्यांची नावे पहिल्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाली नाहीत, त्यांची पुरवणी राजपत्रामध्ये नावे येणार असल्याने नागरिकांनी काळजी करु नये. यावेळी शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, नुकसानीचे पंचनामे घाईत झाले असून काही शेतकऱ्यांचे पंचनामे पुन्हा करावे. शक्य असणाऱ्या ठिकाणी महामार्ग सरळ करुन दोन्ही बाजूला समसमान महामार्ग करण्याची मागणी केली. यावेळी नॅशनल हायवे अॅथोरटी चे समन्वयक चेतन गावडे, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अमोल पाटील, भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाचे उपाध्यक्ष गजानन वाकसे, अंकुश जामदार, निलेश पाटील, विक्रमसिंह निंबाळकर, विनीत पाटील, आर. डी. निंबाळकर, गणेश फडतरे, मल्हारी भोसले उपस्थित होते.

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ये-जा करण्यासाठी रस्ता ठेवण्याची मागणी...
लासुर्णे (ता. इंदापूर ) येथे संत तुकाराम  महामार्गालगत प्राथमिक आरोग्य केंद्र व पशुवैद्यकीय दवाखाना येत असून नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता ठेवण्याची मागणी भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाचे उपाध्यक्ष गजानन वाकसे यांनी प्रांतधिकारी व नॅशनल हायवे अॅथोरटी यांच्याकडे केली आहे.

Web Title: sant tukaram maharaj palkhi route farmer land indemnification