पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल

wari
wari

पिंपरी - संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी शहर पोलिस वाहतूक विभागाने बुधवारपर्यंत (ता. २६) वाहतुकीत बदल केले आहेत. काही रस्ते बंद केले असून त्याची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. 

अशी असेल व्यवस्था
पालखी मंगळवारी (ता. २५) देहू येथून मार्गस्थ होईपर्यंत चाकण-देहूफाटा, येलवाडी फाटा-ड्रायव्हर ढाबा व भंडारा डोंगर पायथा रस्ता बंद असेल. त्याऐवजी तळेगाव-देहूरोड मार्गाचा वापर करावा. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील देहूगाव कमान रस्त्याऐवजी देहूरोड-तळेगाव किंवा निगडी मार्गाचा वापर करावा. तळवडे-देहूगाव जाणाऱ्या कॅनबे चौकऐवजी देहू-आळंदी रस्त्यावरून कॅपजेमिनी चौक ते निघोजे एमआयडीसी रस्ता, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा या मार्गाचा वापर करता येईल. 

परंडवाल चौक ते देहू कमान ते भक्ती शक्ती चौकातून पालखी जाईपर्यंत जुना मुंबई-पुणे रस्त्यावरील सेंट्रल चौक रस्ता पहाटे तीनपासून बंद असेल. मुंबईकडून येणाऱ्या सर्व वाहतूक किवळे मार्गे कात्रज बायपास मार्गावर वळविली आहे. भक्ती-शक्ती चौकातील रस्ता सकाळी सातपासून बंद असेल. मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी भक्ती-शक्ती चौकातून भेळ चौक, संभाजी चौक रावेत मार्गाचा, निगडी ट्रान्स्पोर्टनगरकडून भक्ती-शक्ती चौकाकडे येणारी वाहतूक बंद असेल. पुण्याकडून मुंबईकडून जाणारी वाहने खंडोबामाळ चौकातून डावीकडून वळून चापेकर चौक रावेत मार्गाने जाता येईल. पालखी भक्ती-शक्ती चौक ते आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी पोचेपर्यंत मुंबईकडून चौकाकडे येणारी वाहतूक भोसरीकडे जाण्यासाठी त्रिवेणीनगर, थरमॅक्‍स चौक मार्गाचा व चिंचवड किंवा वाकडसाठी भेळ चौक, संभाजी चौक रस्त्याचा वापर करावा. दुर्गादेवी चौक ते टिळक चौक रस्त्याऐवजी चिकण चौक किंवा थरमॅक्‍स चौक ते खंडोबा माळ रस्त्याचा तर म्हाळसाकांत चौक ते टिळक रस्त्याऐवजी खंडोबामाळ-संभाजी चौक-बिजलीनगर-रावेत मार्गाचा वापर करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com