संतोष भोसले यांना मदतीच्या हाताची अपेक्षा

संतोष भोसले
संतोष भोसले

पौड रस्ता - ‘उसाच्या चरकात दोन्ही हात गमावले, डॉक्‍टरांनी सहा महिन्यांचा कालावधी दिला आहे. तोपर्यंत कुटुंबाचे पोट भरायचे कसे, असा प्रश्‍न पडला असून, मला मदतीची गरज आहे,’ हे बोल आहेत कोथरूडमध्ये राहत असलेल्या संतोष भोसले यांचे.

दुष्काळामुळे गावात जगणे मुश्‍कील झाले म्हणून भोसले हे कोथरूडमधील मामाकडे राहायला आले. मिळणाऱ्या मजुरीत पोट भरेना म्हणून त्यांनी मयूर कॉलनीत छोटे उसाचे गुऱ्हाळ सुरू केले. यामुळे संसार कसाबसा मार्गी लागला. गेल्या महिन्यात सात फेब्रुवारीला उसाच्या चरकात हात अडकल्याने त्यांचे दोन्ही हात निकामी झाले. यामुळे दवाखान्याचा खर्च दोन लाखांवर गेला. हात व्यवस्थित होण्यासाठी फिजिओथेरपिस्टचे उपचार सुरू आहेत.

हात सुरळीत होण्यासाठी किमान सहा महिने लागतील, असे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. त्यात जी बोटे गमावली ती पुन्हा येऊ शकणार नाहीत, असेही डॉक्‍टरांनी सांगितले असल्याचे भोसले यांनी सांगितले.

गुऱ्हाळ बंद झाल्याने संतोषच्या पायाखालची जमीनच सरकली. संसारासाठी आणि त्यांच्या हातावरील उपचारासाठी पैसा कोठून उभा करायचा, सुशिक्षित असूनही नोकरी नाही आणि स्वयंरोजगार आहे; तर नवऱ्याचे दोन्ही हात काम करत नाहीत, अशी परिस्थिती त्यांची पत्नी सुवर्णा यांच्यावर ओढवली आहे. औषधोपचाराचा खर्च, मुलीचे शिक्षण आणि पोट भरण्यासाठी त्यांना मदतीची आवश्‍यकता आहे. त्यांची पत्नी सुवर्णा इंग्रजी माध्यमातून एमए, बी. एड. झाल्या आहेत. मात्र, शिक्षकभरती होत नसल्याने आता त्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. स्वबळावर प्रगती करण्याची आणि सन्मानाने जगण्याची ही धडपड सुरू असतानाच अचानक संतोष यांच्यावर संकट कोसळले. दवाखान्याचा खर्च दोन लाखांवर गेला. गुऱ्हाळ बंद झाल्याने संतोषच्या पायाखालची जमीनच सरकली. संसारासाठी आणि पतीच्या उपचारासाठी पैसा कोठून उभा करायचा, सुशिक्षित असूनही नोकरी नाही आणि स्वयंरोजगार आहे; तर नवऱ्याचे दोन्ही हात काम करत नाहीत, अशी परिस्थिती भोसले कुटुंबीयांवर आली आहे. हात पुन्हा काम करण्याजोगे होईपर्यंत किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. औषधोपचाराचा खर्च आणि मुलीचे शिक्षण, संसाराचा गाडा ओढणे, हे सर्व करण्यासाठी त्यांना मदतीची आवश्‍यकता आहे. संकटे आली असली, तरी भोसले डगमगलेले नाहीत. 

मदतीसाठी संपर्क करा - ९३०९७६२८८०

माझे हात जरी निकामी झाले असले, तरी मी जीवनाची लढाई हरलो नाही. सहा महिन्यांत मी उभा राहीन.
- संतोष भोसले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com