बारामतीत संतोष दत्तात्रय अडागळे गँगला मोका

crime
crime

बारामती : येथील तालुका पोलिसांनी खंडणी उकळणाऱ्या बॉंड उर्फ संतोष दत्तात्रय अडागळे गँगला मोका लावला आहे. बारामती उपविभागातील मोकाची ही सलग नववी कारवाई असून आजपर्यंत पोलिसांनी मोका अंतर्गत तब्बल 76 जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. 

उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरिक्षक धन्यकुमार गोडसे व पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनी या बाबत माहिती दिली. 

संतोष अडागळे व त्याचे साथीदारांविरुध्द बारामती तालुका पोलिसात खंडणीसह धमकी देणे, रोख रक्कम चोरुन नेणे असे सहा गुन्हे दाखल आहेत. अडागळे याच्यासह विशाल अप्पा मांढरे व गणेश सत्यवान लांडगे (तिघेही रा. तांदुळवाडी, बारामती) यांच्याविरुध्द पोलिस अधीक्षकांनी मोकाचा प्रस्ताव पोलिस महानिरिक्षकांकडे पाठविला होता, त्यांनी त्याला नुकतीच मंजूरी दिली. 

या प्रकरणी नारायण शिरगावकर यांनी सांगितले की, या प्रकरणात ज्या व्यापा-यांना या टोळीने लुटले होते, ते फिर्याद देण्यासही घाबरत होते, मात्र पोलिसांनी त्यांना दिलासा दिल्यानंतर तक्रारी दाखल झाल्या. दरम्यान कोणालाही अशा प्रकारे धमक्या येत असल्यास अथवा धमकावून लूट सुरु असल्यास त्यांनी तातडीने पोलिसांत फिर्याद दाखल करावी, असेही शिरगावकर यांनी आवाहन केले आहे. दरम्यान या कारवाईनंतर धन्यकुमार गोडसे व त्यांच्या टीमला पोलिस अधीक्षकांनी 15 हजारांचे पारितोषिक या कारवाईसाठी दिले आहे. 

आणखी 48 जण पोलिसांच्या लिस्टवर...
बारामती व इंदापूर तालुक्यात विविध प्रकारच्या सेलिब्रेशनसाठी वर्गणीच्या रुपातून खंडणी गोळा करणे, फेसबुक व व्हॉटसअँपचे ग्रुप तयार करुन त्या द्वारे बंदूका, तलवारी हातात घेऊन फोटो टाकणे, तलवारीने केक कापणे, अशा विविध माध्यमातून दहशत माजविणा-या आठ टोळ्या पोलिसांनी शोधून काढल्या आहेत. यातील 48 जण पोलिसांच्या लिस्टवर असून लवकरच त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता नारायण शिरगावकर यांनी बोलून दाखविली. 

रोडरोमिओंवरही कारवाई होणार...
दरम्यान शाळा महाविद्यालय सुरु झाल्यानंतर आता रोडरोमिओंवरही पोलिस कारवाईचा धडाका करणार असून पालकांनी आपला मुलगा या कारवाईत सापडणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com