‘ऑनलाइन’ आमच्यासाठी गैरसोयीचे

Online
Online

गोखलेनगर - एका बाजूला तरुण पिढीमध्ये ऑनलाइनची क्रेझ वाढत आहे, तर दुसरीकडे मात्र ज्येष्ठ नागरिक त्याबाबत अजूनही अनभिज्ञ आहेत. स्मार्ट फोनद्वारे होणारे ऑनलाइन व्यवहार त्यांच्यासाठी गैरसोयीचे वाटत असल्याने त्यांना त्यापासून दूर राहणेच पसंत केले आहे. फोन लावणे, उचलणे किंवा संदेश पाठविण्यासाठीच ते या स्मार्ट फोनचा वापर करत असल्याचे एरंडवणे, प्रभात रस्ता भागातील ज्येष्ठ नागरिकांनी ‘सकाळ’शी संवाद साधताना सांगितले.

जमाना स्मार्ट फोनचा आहे. डिजिटाझेशनची क्रेझ वाढली आहे. प्रत्येक जण फेसबुक, व्हॉट्‌सॲप, इन्स्टाग्राम, यू-टूब, ट्विटर, ऑनलाइन बॅंकिंगचा वापर करत आहे. 

घरातील वीज बिल भरण्यापासून ते बॅंकेतील पैसे ट्रान्सफर करण्यापर्यंत सगळेच व्यवहार घरबसल्या होत आहेत. त्यात वेगवेगळ्या कंपन्यांच्या ऑफर्सचा धडाका असल्याने ग्राहकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे; पण या संख्येत तरुणाई पुढे आहे. तरुणाईची प्रत्येक गोष्ट आता ऑनलाइन होऊ लागली आहे. दिवसातील अधिकतर वेळ याच स्मार्ट फोनवर जात आहे.

एका बाजूला तरुण पिढीची अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे ज्येष्ठ नागरिक स्मार्ट फोन वापरतात का? जर वापरतात तर त्याचा वापर नेमका कशासाठी करतात? आणि नाही करत असतील तर तो का? काय वाटते त्यांना या ऑनलाइनबाबत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने एरंडवणे ते प्रभात रस्ता भागातील ज्येष्ठ नागरिकांशी या विषयावर संवाद साधला असता, अनेक मुद्दे उलगडले. 

त्यांच्याकडे स्मार्ट फोन होते; मात्र त्याचा मर्यादित होता. त्यांना ऑनलाइन व्यवहार असुरक्षित वाटतात. फसवणूक होऊ नये म्हणून ऑनलाइन व्यवहार करत नसल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. आम्ही स्मार्ट फोन फक्त कॉल करणे, कॉल घेणे किंवा संदेश पाठविण्यासाठीच वापरतो. आमचा अधिक तर वेळ पुस्तके, वर्तमानपत्रे वाचण्यात, बातम्या पाहण्यात घालवतो. 

फेसबुक, व्हॉट्‌सॲप, ट्विटर, यू-ट्यूब कसे हाताळावे याची पुरेशी माहितीसुद्धा नसल्याने आम्ही त्या भानगडीत पडत नाही, तर काही ज्येष्ठ नागरिक स्मार्ट फोनचा वापर करतात. पण तोही मर्यादित. गॅस बिल, वीज बिल, डीटूएच रिचार्ज करण्यासाठी. एकंदरीत त्यांना हे ऑनलाइन व्यवहार असुरक्षित वाटत आहेत.

ज्येष्ठांच्या प्रतिक्रिया
ए. आर. गोंगटे  (एरंडवणे) -
 मी फोन करणे, उचलणे यासाठीच स्मार्ट फोन वापरतो. व्हॉट्‌सॲप, फेसबुक, वापरत नाही. वर्तमानपत्रे व टीव्हीवर बातम्या पाहतो. फोन बॅंकिंग वापरत नाही.

श्‍याम भुर्के (एरंडवणे) - बॅंकेतील व्यवहार एसएमएसने समजतात. फेसबुक, व्हॉट्‌सॲप काही प्रमाणात वापरतो. ऑनलाइनचे पूर्ण ज्ञान आल्याशिवाय ते वापरणे धोकादायक आहे. गुगलवरचे लेख वाचतो. हे माध्यम कसे हाताळावे यासंदर्भात मोफत मार्गदर्शन करावे. 

नलिनी बापट (प्रभात रस्ता) - व्हॉट्‌सॲप, ईमेल, ऑनलाइन सेवा मी घेत नाही. घरामध्ये संपर्क साधण्यासाठी मोबाईलचा वापर करते. हातात पुस्तके घेऊन वाचण्यात खरा आनंद मिळतो. ऑनलाइनचा वापर कसा करावा, हे माहीत नाही.

शशिकांत वाघ (भांडारकर रस्ता) - मागील ४ वर्षांपासून स्मार्ट फोन वापरत आहे. व्हॉट्‌सॲप, यू ट्यूब, गाणी ऐकणे, रेडिओ, हवामान इत्यादींसाठी स्मार्ट फोनचा वापर करतो. स्मार्ट फोन वापरणे सोपे झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com