संवाद मेळाव्यातून शिक्षकांना ऊर्जा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सकाळ एनआयई’ (न्यूजपेपर इन एज्युकेशन), ‘सेंटर ऑफ एक्‍सलन्स इन सायन्स ॲण्ड मॅथेमॅटिक्‍स एज्युकेशन’, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च सेंटर पुणे, (आयसर) यांनी इंद्राणी बालन सायन्स ॲक्‍टिव्हिटी सेंटर, पाषाण येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निवासी शिक्षक प्रशिक्षण संवाद मेळाव्यात राज्यातील शिक्षकांनी खगोलशास्त्र, गणित, पक्षिजीवन आणि कृतीयुक्त व मनोरंजक शिक्षण याबाबत तज्ज्ञांशी संवाद साधला.

कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा, बारामती, चंद्रपूर, हेमलकसा, आनंदवन, बीड, श्रीगोंदा, ठाणे परिसरातील दीडशेहून अधिक शिक्षक व मुख्याध्यापक या तीन दिवसांच्या मेळाव्यात सहभागी झाले होते.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ अरविंद गुप्ता, आयसरमधील वरिष्ठ प्राध्यापक व विज्ञान प्रसारप्रमुख एल. एस. शशिधरा, डॉ. अपूर्वा बर्वे, अशोक रूपनेर, शांती पिसे, ‘सकाळ’च्या समूह कार्यकारी संपादक शीतल पवार यांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचे उद्‌घाटन झाले. 

विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसारही शिकवता येते, हा संदेश गुप्ता यांनी विविध प्रयोगांतून दिला. शांती पिसे (बौद्धिक गणित), अशोक रूपनेर व चैतन्य मुंगी (भौतिकशास्त्रातील विविध प्रयोग), प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार (वाचन कौशल्ये व वाचन संस्कृती), ‘माय मिरर पब्लिकेशन’चे संचालक मनोज अंबिके (मुलांशी संवाद), डॉ. आनंद कृष्णन (पक्षिजीवन), डॉ. अरविंद नातू (निसर्गाकडून मिळणारे शिक्षण), डॉ. अपूर्वा बर्वे (स्टेम सेल), डॉ. अपर्णा देशपांडे (इलेक्‍ट्रॉनिक मायक्रोस्कोप), मकरंद टिल्लू (हास्याचे प्रयोग व हास्य पद्धतीचा वापर), डॉ. प्रदीप आगाशे (मनोरंजनातून शिक्षण), डॉ. सत्यजित रथ (सध्याची शिक्षण पद्धती), डॉ. रामकृष्ण भट (भारतीय विज्ञान व संस्कृती) आणि अपर्णा जोशी (डिजिटल लॅब) या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
सहभागी शिक्षकांनी आयुका संस्थेच्या भेटीत दुर्बिणीच्या साह्याने गुरू व शुक्र या ग्रहांविषयी माहिती जाणून घेतली. ‘आयुका’चे संचालक प्रा. सोमक रायचौधरी व सोनल थोरवे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. 

या प्रशिक्षण मेळाव्याचे संयोजन ‘सकाळ एनआयई’चे सहव्यवस्थापक विशाल सराफ, अक्षया केळसकर, सुमित जाधव व एनआयई समन्वयकांनी केले. विठ्ठल शेजवळ, सीमा रूपनेर, श्रद्धा बुरखुंडे, विवेक कानडी, परमेश्‍वर यादव, सुनीता पाटोळे यांनी परिश्रम घेतले.

सभासद नोंदणी सुरू
‘सकाळ एनआयई’ या विद्यार्थिप्रिय उपक्रमाची शैक्षणिक वर्ष २०१८-१९साठी सभासद नोंदणी सुरू झाली आहे. वाचन व लेखन कौशल्ये विकसित करणारा हा उपक्रम आपल्या विद्यालयात सुरू करू इच्छिणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी नजीकच्या ‘सकाळ’ कार्यालयात अथवा विशाल सराफ (९९२२९१३४७३) यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: sanwad campaign teacher sakal NIE