संवेदनशीलतेशी एकरूप चित्रपट हवेत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

पुणे  - ""जग झपाट्याने बदल आहे. तसे चित्रपटांचे विषय, तंत्रज्ञान, मांडणी, आशय, सादरीकरण, प्रेक्षक अशा सर्वच गोष्टींध्ये बदल झाले. प्रादेशिकतेच्या चौकटी पलीकडे चित्रपट गेले आहे. म्हणूनच जागतिक स्तरावरील प्रेक्षकांच्या संवेदनशीलतेशी एकरूप होणाऱ्या चित्रपटांची निर्मिती व्हावी,'' असे मत विविध वक्‍त्यांनी व्यक्त केले. 

संवाद पुणे, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा आयोजित "संवाद मराठी चित्रपटांचा' या चित्रपट संमेलनात "बदलता मराठी चित्रपट' या विषयावरील परिसंवादात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अरुणा अंतरकर, दिलीप ठाकूर, गजेंद्र अहिरे, महेश कोठारे, मेघराजराजे भोसले, वर्षा उसगावकर, राज काझी सहभागी झाले होते. 

मृणाल म्हणाल्या, ""चित्रपटांचे विषय विशिष्ट सीमांमध्ये अडकून राहिलेले नाही. विषयांचे वैविध्य मोठ्या प्रमाणावर बघायला मिळते.'' 

अहिरे म्हणाले, ""चित्रपट हे माध्यम प्रादेशिक सीमारेषांच्या पलीकडचे असते. ते माणसाच्या भावनांशी जोडणारे असते.''  

भोसले म्हणाले, ""बहुतांश निर्मात्यांना चित्रपट निर्मितीचे कोणत्याच प्रकारचे ज्ञान नसते. त्यामुळे दर्जाहीन चित्रपटांची संख्या वाढते. यावर शासनाने योग्य पर्यायाद्वारे अंकुश ठेवणे गरजेचे आहे.'' 

कोठारे म्हणाले, ""मराठी चित्रपटांचे रूप गेल्या दोन दशकात बदलले. विषयातील वैविध्यता, तरुण पिढीकडून होणारे नवे प्रयोग वाखाणण्याजोगे आहेत.'' 

ठाकूर म्हणाले, ""चित्रपटांची गुणवत्ता वाढायला हवी. कारण अस्सल कलाकृतीला प्रेक्षक दाद देतात.'' 

अंतरकर म्हणाल्या, ""राहणीमान, खाद्यसंस्कृती, अभिरुची या बदलांचा परिणाम होणे, स्वाभाविक प्रक्रिया आहे.'' 

Web Title: Sanwad Marathi films in pune